SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर आणि युवा पखवाजवादक कृष्णा साळुंखे यांना यंदाचा पहिलाच 'गुणीदास पुरस्कार २०२६ ' जाहीर, ६ डिसेंबर रोजी होणार पुरस्काराचे वितरणआंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन: ज्ञान, संघर्ष आणि परिवर्तनाचा संदेशकोल्हापुरात 'महा-पल्स एआय' प्रकल्पाचा शुभारंभशिरोली-किणी या मार्गावरील अपघातांचे ऑडिट करण्यात यावे : अपर जिल्हाधिकारी अजय पवारप्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरूसाके येथे शोकाकुल पाटील कुटुंबीयांची पूनम तोडकर यांनी घेतली सांत्वनपर भेटकोल्हापूर महानगरपालिका कारभारावर 'आप'चा संताप: नगरसेवकांकडे प्रशासनाला गतिमान करण्याचे कौशल्य नाही : अभिजीत कांबळेकळंब्यात व्यावसायिक गाळ्यांचे उद्घाटन; ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भररिंगरोडच्या दर्जेदार विकासासाठी दीड कोटींचा निधी लवकरच मिळणार: नगरसेवक अभिजित खतकर यांची माहितीतात्यासाहेब कोरे पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय वेगळेपणा जपेल : डॉ. विनय कोरे

जाहिरात

 

ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर आणि युवा पखवाजवादक कृष्णा साळुंखे यांना यंदाचा पहिलाच 'गुणीदास पुरस्कार २०२६ ' जाहीर, ६ डिसेंबर रोजी होणार पुरस्काराचे वितरण

schedule17 Nov 26 person by visibility 6 categoryसामाजिक

कोल्हापूर : 'साहित्य, संगीत कला आनंद: स:ब्रह्मानंद:' हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवत गेल्या १७ वर्षांपासून कोल्हापूरच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या गुणीदास फाऊंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने या वर्षापासून 'गुणीदास पुरस्कार' सुरू करण्यात येत आहे.यावर्षीचा पहिला गुणीदास कलासाधक पुरस्कार' ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. उल्हास कशाळकर यांना जाहीर झाला आहे. तसेच, 'गुणीदास नवोन्मेष पुरस्कार' युवा पखवाजवादक कृष्णा साळुंखे यांना प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती गुनिदास फाउंडेशनचे सेक्रेटरी डॉक्टर अजित शुक्ल यांनी पत्रकार परिषदेत दिली. साहित्य, संगीत आणि कला क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या कलाकारांचा सन्मान या पुरस्काराद्वारे केला जाणार आहे. असे शुक्ल यांनी सांगितले.

  हा पुरस्कार प्रदान सोहळा आणि विशेष सांगीतिक कार्यक्रम रविवार, दिनांक ६ डिसेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला श्री करवीर पीठाचे श्रीमद् जगद्गुरू सच्चिदानंद शंकराचार्य विद्यानृसिंह भारती आणि ज्येष्ठ तबलावादक तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांची उपस्थिती लाभणार असून, त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील.

      यावेळी पुरस्कार प्रदान सोहळ्यानिमित्त विशेष सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये मृदंग कीर्तन युवा पखवाजवादक कृष्णा साळुंखे आणि त्यांचा शिष्य परिवार हे मृदंग कीर्तन सादर करतील. त्यांना गायनात सूरंजन खंडाळकर आणि हार्मोनियमवर मिलिंद कुलकर्णी साथसंगत करतील.  पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांचे बहारदार शास्त्रीय गायन होणार आहे. या मैफलीला तबल्यावर तालयोगी पं. सुरेश तळवलकर आणि हार्मोनियमवर मिलिंद कुलकर्णी यांची समर्पक साथ लाभणार आहे.

     या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि निवेदन विघ्नेश जोशी करणार आहेत. कोल्हापूरकरांनी आणि रसिक श्रोत्यांनी या सांगीतिक मेजवानीचा व पुरस्कार सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे  गुणीदास फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुस्मिता शिरीष सप्रे,  राजप्रसाद धर्माधिकारी, पुरस्कार निवड समिती,आणि गुणीदास फाऊंडेशनच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे.पत्रकार परिषदेसाठी  गुणीदास फाऊंडेशनचे सेक्रेटरी
डॉ. अजित शुक्ल,कार्यक्रम समिती प्रमुख  राजप्रसाद धर्माधिकारी,खजानिस अरविंद लाटकर,ललित कला विभाग प्रमुख शिवाजी विद्यापीठ (पुरस्कार समिती सदस्य)
डॉ विनोद ठाकूरदेसाई 
संचालक अभय देशपांडे,दर्शन शिरपूरकर,सुधर्म जामसांडेकर, 
गौरी केसकर,प्रणव मोघे आदी 
उपस्थित होते.

🟣 पं. उल्हास कशाळकर (सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक) यांचा परिचय

पं. उल्हास कशाळकर (सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक)
कलाकारांचे कलाकार म्हणून ख्याती असलेले ,हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक दिग्गज आणि ज्येष्ठ गायक . ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा या तिन्ही घराण्यांच्या गायकीचा सुरेख संगम साधणारी त्यांची स्वतंत्र शैली संगीत रसिकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारचा प्रतिष्ठित 'पद्मश्री', 'संगीत नाटक अकादमी पुरस्कार' महाराष्ट्र सरकारचा पं भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार आणि 'तानसेन सन्मान' यांसारख्या सर्वोच्च पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. नुकतीच त्यांना आयटीएम विद्यापीठ ग्वाल्हेर तर्फे मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

🟣युवा पखवाजवादक कृष्णा साळुंखे  यांचा परिचय

युवा पखवाजवादक कृष्णा साळुंखे  मृदंगाचार्य पं नानासाहेब पानसे परंपरेचे आणि 'तालयोगी' पं. सुरेश तळवलकर यांचे प्रतिभावान शिष्य असलेले आघाडीचे युवा पखवाज वादक आहेत. पखवाजाचे प्रारंभिक धडे त्यांनी श्री विष्णुपंत लोंढे याच्याकडे घेतले. पारंपरिक पखवाज वादनाला आधुनिकतेची जोड देत त्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण 'पखवाज शिवतांडव' या सादरीकरणातून देश-विदेशातील रसिकांची मने जिंकली आहेत. तसेच, 'कृष्णनाद पखवाज गुरुकुल' या संस्थेच्या माध्यमातून ते नव्या पिढीला पखवाज वादनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण देऊन ही प्राचीन कला वृद्धिंगत करत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes