पंचगंगा घाटाची कोल्हापूर महापालिकेच्यावतीने फायर फारयटद्वारे स्वच्छता
schedule31 Jul 25 person by visibility 224 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : शहरासह जिल्हयामध्ये पावसाने उघडीप दिल्याने पंचगंगा नदीचे पाणी पुन्हा पात्रात गेले आहे. जिल्हयामध्ये जोरदार पाऊस होऊन पंचगंगा नदीचे पाणी तिसऱ्यांदा पात्रा बाहेर आले होते. यापुर्वी महापालिकेने फायर फायटरद्वारे या घाट व परिसराची स्वच्छता केली होती. पुन्हा घाटावर पाण्याबरोबर आलेला चिखल संपुर्ण घाटावर पसरला होता. पूराचे पाणी ओसरल्यानंतर चिखलामुळे नागरीकांना घाटावर ये-जा करण्यासाठी अडचण होत होती. त्यामुळे महापालिकेने आज पाणी ओसरल्यानंतर तातडीने या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविली. यावेळी पूराच्या पाण्याबरोबर आलेला चिखल अग्निशमन विभागाच्या फायर फायटरने पाणी मारुन काढण्यात आला.
यासाठी 1 फायर फायटर, व 1पाण्याचे टँकरची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी 8 फायरमन, 1 आरोग्य निरिक्षक, 1 मुकादम व सफाई कर्मचा-यांमार्फत सदरचे काम पुर्ण करण्यात आले आहे. सदरची स्वच्छता मोहिमे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
त्याचबरोबर बोटॅनिकल गार्डनमध्ये आलेला कचरा सफाई कर्मचाऱ्यांमार्फत उठाव करण्यात आला. यामध्ये 2 डंपर इतका कचरा उठाव करण्यात आला. सदरची सफाई 1 आरोग्य निरिक्षक व 12 सफाई कर्मचा-यांमार्फत पुर्ण करण्यात आली.