डीकेटीईच्या १५ विद्यार्थ्यांची ऍक्युटेक पॉवर सोल्युशन कंपनीत निवड
schedule31 Jul 25 person by visibility 263 categoryशैक्षणिक

इचलकरंजी : डीकेटीईच्या इलेक्ट्रीकल, ईएनटीसी इंजिनिअरींग व एमबीए विभागातील १५ विद्यार्थ्यांची ऍक्युटेक पॉवर सोल्युशन या नामांकीत कंपनीमध्ये निवड झाली आहे. ऍक्युटेक पॉवर सोलुशन ही युपीएस पॉवर बॅकअप मधील नामांकित कंपनी आहे. ऍक्युटेक पॉवर सोल्युशन या कंपनीतील तज्ञ मंडळींनी डीकेटीईस भेट दिली व इलेक्ट्रीकल विभागातून ४, ईएनटीसी इंजिनिअरींग तून २ व एमबीए विभागातील ९ विद्यार्थ्यांची असे एकूण १५ विद्यार्थ्यांची इंटरव्हयुवद्वारे उत्तम पॅकेजेवरती निवड झाली आहे.
डीकेटीई आणि ऍक्युटेक पॉवर सोलुशन, मुंबई यांच्यामध्ये संयुक्त विद्यमाने बी.टेक. इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग आणि बी.टेक. इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेल्युकम्युनिकेशन मधील विद्यार्थ्यांसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स हे केंद्र सुरु केले आहे. डीकेटीईमध्ये साकारलेले ऍक्युटेक या कंपनीच्या अत्याधुनिक सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन व इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग मधील विद्यार्थ्यांना यु.पी.एस. क्षेत्रातील अदयायवत प्रशिक्षण देण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये पॉवर टेक्नॉलॉजी क्षेत्रात विद्यार्थी रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट प्रकल्प पूर्ण करीत आहेत व त्यामुळे त्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळत आहे.
तसेच ऍक्युटेक कंपनीने डीकेटीई सेंटर ऑफ एक्सलंस दिले असल्यामुळे आण्णामचार्या विद्यापठामधून १५ मुलांची निवड केली होती त्या विद्यार्थ्यांसोबत डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना मिळून ऍक्युटेकच्या सेंटर ऑफ एक्सलंन्स ट्रेनिंग देण्यात आले.
डीकेटीई ही संस्था इंजिनिअरींगमधील विद्यार्थ्याना प्लेसमेंट गुणवत्ता वाढीसाठी व उद्योजकता गुणांचे वाढ करुन त्या विद्यार्थ्यांना कार्यक्षम बनविण्यासाठी व तंत्रशिक्षणामधील विद्यार्थ्यांना उत्तम पॅकेजवरती नोकरी देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. डीकेटीईमध्ये विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमधील नवनविन बदलांचा अभ्यास करण्यासाठी इंडस्ट्री व्हीजीट, इंडस्ट्री ट्रेनिंग यांचे वेळोवेळी आयोजन केले जाते यामुळेच डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे नेहमीच दर्जेदार प्लेसमेंट होत असते.
या यशाबददल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टींनी शुभेच्छा दिल्या. ऍक्युटेक कंपनीमार्फत डॉ देवेंद्र बोरा,रुचिका नाईक, सुनिल जाधव, दिपक पवार, प्रमोद पोटजाळे, रक्षदा कांबळे व संदीप घावरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. डॉ देवेंद्र बोरा यांच्या अथक परिश्रमामुळे डीकेटीई आणि ऍक्युटेक यांच्यात सामंजस्य करार झाला.विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ.सौ.एल.एस.अडमुठे, विभागप्रमुख डॉ एस.ए.पाटील, प्रा. डॉ. आर.एन.पाटील, पी.एस.जाधव,टीपीओ जी.एस. जोशी व प्रा.ए.एस.गणपते यांचे मार्गदर्शन लाभले.