SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जनतेच्या लढ्याला यश : पालकमंत्री कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच : पश्चिम महाराष्ट्रातील लाखो नागरिकांच्या दशकांहून अधिक काळ चाललेल्या संघर्षाला अखेर यश : मंत्री चंद्रकांतदादा पाटीलमहायुती सरकारकडून कोल्हापूरला गिफ्ट, उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू होत असल्याने कोल्हापूरच्या लढावू बाण्याला यश : खासदार धनंजय महाडिकडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला ‘क्यूएस आय-गेज’ डायमंड मानांकनाने गौरव; तेलंगणा राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठाला प्रमाणपत्र प्रदानकेआयटी राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या विश्वासास पात्रपश्चिम महाराष्ट्रात वारणा विद्यापीठाच्या कोरे अभियांत्रिकीस इंजिनिअरिंगच्या सर्वाधिक जागाकोल्हापुरी चप्पल जीआय टॅगचे अधिकृत स्वामित्व लिडकॉम व लिडकर महामंडळाकडेचअण्णा भाऊ साठे यांची शिवाजी विद्यापीठात जयंतीमलेशियामध्ये डॉ. पद्मारेखा जिरगे यांच्या आंतरराष्ट्रीय शोधनिबंधाचे सादरीकरण होणारनियमांचे पालन करुन गणेशोत्सव उत्साहात साजरा करा; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे गणेश मंडळांना आवाहन

जाहिरात

 

नियमांचे पालन करुन गणेशोत्सव उत्साहात साजरा करा; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे गणेश मंडळांना आवाहन

schedule01 Aug 25 person by visibility 219 categoryराज्य

▪️मोठ्या गर्दीत पण कायद्याच्या चौकटी पाळून गणेशोत्सव साजरा करा, पारंपरिक वाद्यांचा वापर करा; 'गणराया अवॉर्ड' यावर्षीपासून पुन्हा सुरु :  पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता
▪️पाऊस थांबल्यावर रस्ते दुरुस्ती करण्यात येणार : महानगरपालिका आयुक्त डॉ. के मंजूलक्ष्मी
▪️'नो डीजे, नो डॉल्बी, नो लेझर..' चा संदेश देशाला देऊया : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.

कोल्हापूर : नियमांचे पालन करुन पर्यावरणपूरक पद्धतीने मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. 

शांतता व दक्षता समिती सदस्य तसेच गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची शाहू स्मारक भवन येथे बैठक घेण्यात आली. यावेळी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे, शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा कोल्हापूर जिल्ह्याने आजवर जपला आहे. नियमांचे पालन करणारा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरने पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा. सर्व गणेश मंडळांनी पर्यावरण रक्षणासह विविध सामाजिक संदेशावर आधारित देखावे सादर करावेत. मंडळांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीत ध्वनी मर्यादा ओलांडली जाणार नाही, लेझरचा वापर होणार नाही याची दक्षता घेऊन तसेच कोणतेही गालबोट लागू न देता हा उत्सव आनंदाने साजरा करा, असे आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी केले.

▪️कायद्याच्या चौकटी पाळून गणेशोत्सव उत्साहात साजरा करा; पारंपरिक वाद्यांच्या वापर करा :  पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता

जिल्ह्यातील तरुण, तरुणी, महिला व नागरिकांच्या उपस्थितीने मोठ्या गर्दीत पण कायद्याच्या चौकटी पाळून उत्साहाने गणेशोत्सव साजरा करुया, असे आवाहन करुन समिती सदस्य व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत 'गणराया अवॉर्ड' यावर्षीपासून पुन्हा सुरु करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दिले.

 गुप्ता म्हणाले, गणेशाच्या मूर्तीचा आकार डॉल्बीचा आवाज मंडळाभोवती जमणाऱ्या नागरिकांची संख्या मोठा मंडप यावर गणेशाची श्रद्धा ठरत नाही. कोल्हापूरला गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. गणेश मंडळांनी आपल्या मंडळांच्या देखाव्यांमधून 'स्वस्थ आणि सुरक्षित कोल्हापूर' चा संदेश द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करुन अशा मंडळांना पोलीस विभागाचे पथक भेट देण्याबरोबरच आरतीमध्येही सहभागी होऊन मंडळांच्या अडचणी जाणून घेईल, असे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवामध्ये लेझरचा वापर करु नका. डीजेला बंदी नसली तरीही आवाजाची मर्यादा पाळा. पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर द्या. देखाव्यांमधून सामाजिक संदेश द्या, असे आवाहन श्री. गुप्ता यांनी केले.

कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी म्हणाल्या, शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी विभागनिहाय निधी वाटप करण्यात येत असून पाऊस थांबल्यावर रस्ते दुरुस्तीची कामे करण्यात येतील. गणेशोत्सव व मिरवणूक काळामध्ये विद्युत व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी नियोजन केले जाईल. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. म्हणाले, पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी कोल्हापूर जिल्हा ओळखला जातो. सामाजिक बदल घडवणे ही आव्हानात्मक बाब असली तरीही कोल्हापुरात मात्र असे बदल घडल्याचे पर्यावरणपूरक गणेशोत्सव व अन्य उपक्रमातून दिसून आले आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये 'नो डीजे, नो डॉल्बी, नो लेझर..' चा संदेश देशाला कृतीतून देऊया आणि चित्रनगरीसाठी प्रसिद्ध असणारे कोल्हापूर शांततानगरी असल्याचे दाखवून देऊया, असे आवाहन श्री. कार्तिकेयन यांनी केले. 

सीपीआरचे हृदयविकार विभाग प्रमुख डॉ. अक्षय बाफना तसेच कान, नाक, घसा तज्ञ डॉ. संतोष कुलकर्णी म्हणाले, हृदय, कान व डोळे हे शरीराचे अत्यंत महत्वाचे अवयव आहेत. या अवयवांच्या सुरक्षिततेसाठी तसेच मानवी आरोग्यासाठी गणेशोत्सव, विसर्जन मिरवणूक तसेच अन्य सण समारंभा दरम्यान आवाजाची मर्यादा पाळणे आवश्यक आहे. तसेच लेझरचा वापर अत्यंत हानिकारक असून तो टाळण्याचे आवाहन त्यांनी केले.

शांतता व दक्षता समितीचे सदस्य तसेच गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. मिरवणूक काळामध्ये महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी हेल्पलाइन क्रमांक द्यावा, मिरवणूक मार्गावर विद्युत व्यवस्था सुरळीत रहावी, सर्व गणेश मंडळांना महाद्वार रोडवरील मिरवणुकीत सहभागी होता येण्यासाठी मिरवणूक रेंगाळणार नाही यासाठी उपाययोजना व्हावी, सर्व मंडळांना समान न्याय द्यावा, शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व्हावी, आदी सूचना मांडून कोल्हापूरचा गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा होण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. 

सूत्रसंचालन जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक खानापूरेयांनी केले. आभार पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी मानले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes