SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
रंकाळा तलावावर उद्या शुक्रवारपासून आकर्षक विद्युत रोषणाईसह कारंज्यांचा आनंदडी. वाय. पाटील विद्यापीठात अन्न सुरक्षा, व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात कोल्हापूर महानगरपालिका : स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरीची अचानक तपासणी ; 58 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसॅन मरीनो: जगातील सर्वात जुने आणि अविरत प्रजासत्ताकप्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था, रुग्णालयांपासून 100 मीटर परिसर फेरीवालामुक्त कराकोल्हापूर : उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई, 31 हजार 700 रुपयांचा दंड वसूलनेपाळ दुर्घटना: बेपत्ता नागरिकांच्या ओळखीसाठी मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये डीएनए नमुना संकलन सुरूसभासदांच्या खात्यावर प्रति टन १०० रुपये जमा करणार : चेअरमन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची घोषणा; शरद सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शाश्वत शेती काळाची गरज : अंकुश पाटील; कृषी विभाग व शरद सहकारी साखर कारखाना आयोजित ऊस पिक परिसंवाद उत्साहातरोजगार महाकुंभ मेळाव्याचे 29 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात आयोजन

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिका : स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरीची अचानक तपासणी ; 58 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

schedule03 Sep 26 person by visibility 190 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व 20 प्रभागांमध्ये आज उपायुक्त परितोष कंकाळ, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार व स्वच्छता समन्वयक यांनी आज सकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष जाऊन अचानक हजेरीची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये कर्तव्यावर गैरहजर असलेल्या तसेच गणवेश न परिधान केलेल्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

     या तपासणीदरम्यान गणवेश न परिधान केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 500 रुपये दंड करण्यात आला. तसेच विनापरवानगी गैरहजर राहिलेल्या 58 कर्मचाऱ्यांवर प्रत्येकी 1 हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. याशिवाय सातत्याने गैरहजर राहणाऱ्या 14 कर्मचाऱ्यांची नोंद घेण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

 शहरातील स्वच्छता राखणे हे महानगरपालिका प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्याचे काम आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आपली कर्तव्ये जबाबदारीने पार पाडणे आवश्यक असून या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा अथवा कर्तव्यचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याबाबत सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत.

  शहरातील स्वच्छता व्यवस्थेत अधिक शिस्त व कार्यक्षमता आणण्यासाठी अशा प्रकारच्या आकस्मिक हजेरी तपासण्या यापुढेही नियमितपणे करण्यात येणार आहेत. नागरिकांना स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी शहर उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes