रंकाळा तलावावर उद्या शुक्रवारपासून आकर्षक विद्युत रोषणाईसह कारंज्यांचा आनंद
schedule03 Sep 26 person by visibility 184 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : शहराचे वैभव असलेल्या ऐतिहासिक रंकाळा तलाव येथे महापालिकेच्यावतीने आकर्षक विद्युत रोषणाई ध्वनीप्रणालीसह पाण्याचे कारंजे सुरू करण्यात येत आहेत. नागरिक व पर्यटकांना रंकाळा तलावाचे सौंदर्य अनुभवता यावे यासाठी कारंजे नियमित सुरू ठेवण्यास आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी मान्यता दिली आहे.
रंकाळा तलाव येथे आकर्षक विद्युत रोषणाई व ध्वनीप्रणालीसह पाण्याचे कारंजे बसविण्याचे भाग-१ व भाग-२ मधील काम मे.स्टार रिवाइंडर अँड इलेक्ट्रिकल्स यांच्यामार्फत करण्यात आले आहे. या अनुषंगाने प्रत्येक आठवड्यात शुक्रवार ते सोमवार असे चार दिवस कारंजे सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यानुसार या चारही दिवशी सायंकाळी ७.३० ते ७.४५ आणि ८.३० ते ८.४५ या दोन वेळेत आकर्षक विद्युत रोषणाई व ध्वनीप्रणालीसह पाण्याचे कारंजे सुरू राहणार आहेत.
रंकाळा तलावाच्या नयनरम्य वातावरणात विद्युत रोषणाई, संगीत आणि कारंज्यांचे आकर्षक दृश्य नागरिकांना पाहता येणार असून यामुळे रंकाळा तलावाच्या पर्यटन सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. नागरिकांनी या सुविधेचा आनंद घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.