SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये 'मराठी राजभाषा दिन' उत्साहात साजराराष्ट्रीय विज्ञान दिन: विज्ञानाचा उत्सव आणि प्रगतीची वाटचालसाखर कारखान्यांना विशेष आर्थिक पॅकेज द्या : आमदार सतेज पाटील यांची मागणी : विधिमंडळात लक्षवेधीद्वारे वेधले लक्षघराघरात अस्मितेसोबत मराठी ज्ञानभाषा करणेमायमराठीच्या उद्याच्या भविष्यासाठी आवश्यकमहास्वच्छता मोहीमेत 30 टन कचरा संकलित; स्वच्छता मोहिमेत स्वयंसेवी संस्था, नागरिक व अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभागघरफाळा थकबाकीपोटी मनीषा नगर येथील बारबेल्स जीम ऍ़न्ड फिटनेस सेंटर सीलहोळी लहान करा, शेणी दान करा : महापौर रुपाराणी निकम यांचे आवाहनभाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे रविवारी १ मार्चला कोल्हापुरात होणार कार्यकर्त्यांच्या रॅलीद्वारे जल्लोषी स्वागतसंवेदनशील, रचनात्मक शिक्षणातूनच सामाजिक समावेशन शक्य: प्रा. रेणू दांडेकरडॉ. डी.वाय.पाटील पॉलीटेक्निकची बॅडमिंटनमध्ये विजेतेपदाची हॅट्ट्रिक

जाहिरात

 

प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये 'मराठी राजभाषा दिन' उत्साहात साजरा

schedule28 Feb 26 person by visibility 103 categoryशैक्षणिक

◼️मराठी साहित्याचा जागर; मुख्याध्यापिका एस. आर. पाटील यांनी उलगडला भाषेचा समृद्ध वारसा

कोल्हापूर : मराठी भाषेचे वैभव आणि थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर ऊर्फ 'कुसुमाग्रज' यांचा वारसा जपण्यासाठी, येथील प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये 'मराठी राजभाषा दिन' मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मराठी विभागप्रमुख एम. एम. भांडवले यांनी कुसुमाग्रजांचा जीवनप्रवास आणि त्यांच्या अजरामर साहित्याचा परिचय करून दिला. शिक्षिका सुवर्णा पवार यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्यिक योगदानावर प्रकाश टाकला, तर काळे सर यांनी मराठी भाषेचा गौरव करणारी ओघवत्या शैलीत कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

प्रशालेतील विद्यार्थिनी अरुंधती खवास, स्नेहल पाटील व संस्कृती पाटील यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषेचे महत्त्व आणि तिची थोरवी विषद केली. ज्येष्ठ शिक्षिका आर. व्ही. मगरे यांनी विद्यार्थिनींना अवांतर वाचनाची गोडी लावण्याचे आणि मराठी साहित्य अभ्यासण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका एस. आर. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेचे जागतिक स्थान अधोरेखित केले. त्यांनी ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांची 'मुलगा' ही कविता अत्यंत प्रभावीपणे सादर केली, ज्याला विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त दाद दिली.

या दिनाचे औचित्य साधून वाडकर सर यांनी प्रशालेच्या मुख्य फलकावर सुंदर काव्यपंक्तीसह आकर्षक फलक लेखन केले होते, जे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
या प्रसंगी पर्यवेक्षिका ए. एस. आंबर्डेकर यांच्यासह सर्व मराठी विषय शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन एन. ए. पुणेकर यांनी केले, तर एस. एस. गोणी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes