SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शक्तीपीठ महामार्ग विरोधी लढा : बांधा ते वर्धा मे अखेरीस संघर्ष यात्रा काढणार : आमदार सतेज पाटीलकोल्हापूर महानगरपालिकेतर्फे एअर रायफल ट्रेनिंगचे 10 मे पासून प्रशिक्षण सुरुडी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात बौद्धिक संपत्ती अधिकार कक्षाची स्थापना; मायक्रेव्ह कन्सल्टंसी समवेत सामंजस्य करारसकारात्मक सुरुवात, सातत्य, संयम ठेवा स्वप्न साध्य होईल : ईशा झंवर; केआयटी प्रचंड उत्साहामध्ये ई-समीट संपन्नकोल्हापूर महापालिकेसमोर खेळणी रचून 'आप'चे आंदोलन; उद्यानातील मोडकी खेळणी बदलण्याची मागणीशक्तीपीठ महामार्गा विरोधातील शेतकऱ्याची आज ऑनलाईन राज्यव्यापी बैठकतेज रोलर स्केटिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यशभारताच्या सैन्यदलाला सलाम ! जयहिंद !!निकालानंतर 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची मोफत सेवाडीकेटीईच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्नीकमध्ये एआयएमएल व मेकॅट्रॉनिक्स पदविका अभ्यासक्रमांना एआयसीटीई, दिल्लीकडून मान्यता; दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांस सुवर्णसंधी

जाहिरात

 

‘शिवाजी विद्यापीठा’चा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ झालाच पाहिजे ! जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

schedule17 Mar 25 person by visibility 387 categoryराज्य

कोल्हापूर - कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठ’, चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असा नामविस्तार करण्यात यावा या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, 17 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. १० सहस्रो हिंदूंनी एकमुखाने ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार झालाच पाहिजे, अशी मागणी केली. मोर्चाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. दसरा चौकातून चालू झालेला हा मोर्चा लक्ष्मीपुरी, व्हिनस कॉर्नर मार्गे ‘बी’ न्यूजच्या कार्यालयावरून जिल्हाधिकारी कार्यालय येथे समाप्त झाला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा आल्यावर जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. याच समवेत  क्रूर औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण तात्काळ थांबवण्यासाठी कबरीला दिला जाणारा निधी बंद करावा, तसेच औरंगजेबाची कबर काढून टाकण्यात यावी, या मागणीचेही निवेदन देण्यात आले. 

या मोर्चात विविध आध्यात्मिक संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष, तरुण मंडळे, विविध सामाजिक संघटना, व्यापारी संघटना यांचा प्रमुख सहभाग होता. या मोर्चात सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांच्यासह निपाणी येथील प.पू. प्राणलिंग स्वामिजी यांचा सहभाग होता. 

मोर्चाच्या अंती तेलंगणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी.राजासिंह,  सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक  सुनील घनवट, छत्रपती ग्रुपचे संस्थापक  प्रमोद पाटील यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सहभागी असलेल्या मावळांचे वंशज यांनी मनोगत व्यक्त केले. यात प्रामुख्याने वीर शिवा काशीद यांचे वंशज  आनंदराव काशीद, सरदार मालुसरे यांचे 13 वे वंशज कुनाल मालुसरे आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज यांनीही मनोगत व्यक्त केले. 

▪️नामविस्ताराला विरोध करणार्‍या पुरोगाम्यांना हिंदूंच्या संघटितपणाची शक्ती प्रत्युत्तर देईल ! - टी. राजासिंह, आमदार, तेलंगणा 

आज आपण इथे केवळ नामविस्ताराच्या मोर्चासाठी एकत्र आलेलो नसून हिंदूंची अस्मिता, गौरव आणि हिंदवी स्वराज्याचा संकल्प करण्यासाठी एकत्र आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे केवळ विद्यापीठ नसू तो आमचा स्वाभिमान आहे. इतकी वर्षे ‘छत्रपती’ ही पदवी लागू नये यांसाठी प्रयत्न करणे करणारे पुरोगामी आणि सेक्युलरवादी यांना जाहीर आव्हान देण्यासाठीच मी आलोय आणि हिंदूंच्या संघटितपणाची ही शक्ती इथे पाय रोवून उभी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर आजही अनेक अतिक्रमण शिल्लक असून ही अतिक्रमणे शासनाने तात्काळ हटवली पाहिजेत, अन्यथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी ती हटवण्याची मोहीम हातात घ्यावी लागेल. एकीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराला देण्यासाठी  प्रशासनाकडे निधी नाही, तर दुसरीकडे तेच पुरातत्व खाते संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीवर मात्र लाखो रुपये खर्च करत आहे. हे आम्ही सहन करणार नाही. तरी औरंजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी खर्च केला जाणारा निधी तात्काळ सरकारने बंद करावा, तसेच ही कबरही काढून टाकण्यात यावी. 

समारोपप्रसंगी  हिंदु जनजागृती समिती संघटक सुनील घनवट, छत्रपती ग्रुपचे संस्थापक श्री. प्रमोददादा पाटील, भाजप महिला आघाडीच्या रूपाराणी निकम, किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष  जयसिंगराव शिंदे-सरकार, शिवसेनेचे नेते  सत्यजित कदम, नरवीर तानाजी मालुसरे यांचे १३ वे वंशज यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. 

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख  उदय भोसले आणि  किशोर घाटगे, मंदिर महासंघाचे सहसंयोजक  अभिजित पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख  संभाजीराव भोकरे आणि करवीरतालुकाप्रमुख  राजू यादव, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे  आनंदराव पवळ, महाराजा प्रतिष्ठानचे  निरंजन शिंदे, मराठा तितुका मेळवावाचे  योगेश केरकर, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. विठ्ठलतात्या पाटील, ह.भ.प. महादेव महाराज यादव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर जिल्हा कार्यवाह  सुरेश यादव, शहर कार्यवाह  आशिष लोखंडे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

सहभागी संघटना आणि संप्रदाय - ‘श्री’ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, स्वामी समर्थ संप्रदाय, इस्कॉन, मंदिर सेवेकरी, गजानन महाराज भक्त मंडळ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू एकता आंदोलन, हिंदू महासभा,  ‘छत्रपती ग्रुप’, महाराष्ट्र मंदिर महासंघ, ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’, ‘अखिल भारतीय रेशनिंग महासंघ’, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, शिवसेना, भाजप, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, विविध तरुण मंडळे, तालीम

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes