SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
समाजातील प्रत्येक वंचित व्यक्तीला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‘महाज्योती’च्या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहित्य संघ गिरगाव मुंबई येथे दिवाळी पहाट जल्लोषात साजरीडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची दुबईस्थित कंपनीमध्ये वार्षिक 11.2 लाख रुपये पॅकेजसह निवड; इन्स्टिट्यूटची विक्रमी झेपभाजपाच्या वतीने भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन; प्रथम क्रमांक तब्बल 1 लाखाचे बक्षीसकेआयटीत ‘वाचन प्रेरणा दिन’ परिसंवाद’ व ‘संविधान वाचना’ने संपन्नसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यशकोल्हापुरात जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध दांपत्याचा मृत्यूपर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अनाथ मुलांसोबत साजरी केली दिवाळी; मुलांसोबत पणती रंगविण्यात आणि आकाश कंदील बनविण्यात उत्साहाने घेतला सहभागराज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

जाहिरात

 

केआयटीत ‘वाचन प्रेरणा दिन’ परिसंवाद’ व ‘संविधान वाचना’ने संपन्न

schedule19 Oct 25 person by visibility 152 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालय च्या  मध्यवर्ती ग्रंथालयातर्फे ‘वाचन प्रेरणा दिन’ या निमित्ताने ‘रिसर्च पब्लिकेशन्स : रिसर्च पेपर रायटिंग, स्कोपस जर्नल्स, सायटेशन अँड एच-इंडेक्स’’ या विषयावर ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलम यांच्या जयंतीनिमित्त ‘संविधान वाचन’ करण्यात आले.

मंगळवार दि. ७ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या या परिसंवादास शिवाजी विद्यापीठातील नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी शाखेचे सहाय्यक संचालक डॉ. तुकाराम डोंगळे यांनी मुख्य वक्ता म्हणून सहभाग घेतला. संशोधन लेखन कसे असावे, दर्जेदार स्कोपस जर्नल्स कशी ओळखावीत, सायटेशन आणि एच-इंडेक्सचे महत्त्व काय आहे या विषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.आज १५ ऑक्टोबर रोजी मध्यवर्ती ग्रंथालय, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) व राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संविधान वाचन’ करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रा.वसुंधरा महाजनी यांच्या हस्ते डॉ. कलम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर प्रा.रणजीत पाटील व ग्रंथपाल डॉ.रोहन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे संविधान वाचन केले,
महाविद्यालयाचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी  यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या दोन्ही कार्यक्रमास विद्यार्थी, संशोधक व शिक्षकांनी मोठा उस्फुर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथालयाचे मुख्य समन्वयक डॉ. मंदार डी. सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले, तर डॉ. रोहन पवार यांनी प्रास्ताविक केले. मध्यवर्ती ग्रंथालयाने या परिसंवादाचे यशस्वी  नियोजन केले.अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष  साजिद हुदली उपाध्यक्ष  सचिन मेनन सचिव  दीपक चौगुले यांचे प्रोत्साहन लाभले .

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes