कोल्हापुरात जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध दांपत्याचा मृत्यू
schedule19 Oct 25 person by visibility 271 categoryगुन्हे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील परळीनिनाई परिसरात आज (दि.१९) सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध दांपत्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. मृतांमध्ये निनो यशवंत कंक (वय 75), रखूबाई निनो कंक (वय 70) अशी त्यांची नावे आहेत हे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शाहूवाडी तालुक्यातील गोलीवणे गावचे हे दोघे रहिवासी असून, परळीनिनाई येथील बॅकवॉटर परिसरात शेळीपालनासाठी गेले होते. बिबट्याने अचानक हल्ला केला. हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. सकाळी गावकऱ्यांना ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ वनविभाग आणि पोलिसांना कळवले.
जंगल भागात या दोघांचे मृतदेह आढळून आले. विशेष म्हणजे, वन्य प्राण्याने मृतदेहाचे हात आणि पाय खाल्ल्याचे निदर्शनास आले आहे, ज्यामुळे हा हल्ला अतिशय हिंस्त्र स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान वन विभाग, पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस पंचनामा नंतरच नेमके मृत्यूचे कारण समोर येईल मात्र या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.