भाजपाच्या वतीने भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन; प्रथम क्रमांक तब्बल 1 लाखाचे बक्षीस
schedule19 Oct 25 person by visibility 64 categoryसामाजिक

कोल्हापूर : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, मांगल्य आणि परंपरेचा उत्सव. या सणात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच सहभाग असतो. दिवाळी म्हटली की किल्ल्यांची आठवण आलीच, कारण ही परंपरा आपल्या इतिहासाची आणि संस्कृतीची जपणूक करते. या सांस्कृतिक वारशाला पुढे नेण्यासाठी भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा 22 ते 26 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
शहरातील 81 प्रभागा अंतर्गत ही स्पर्धा असून या किल्ले बांधणी स्पर्धेसाठी युनेस्को अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचा समावेश स्पर्धकांनी करणे बंधनकारक असणार आहे.
हे किल्ले पुढीलप्रमाणे : रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी, जिंजी(तामिळनाडू) विद्यार्थ्यांमध्ये इतिहास, भूगोल आणि कला याबद्दलची आवड निर्माण करणे तसेच पारंपरिक किल्ले संस्कृतीचा वारसा जपणे हा या स्पर्धेचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
भव्य बक्षिसे : सदर किल्ला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकास तब्बल एक लाख
द्वितीय क्रमांकाचे बक्षीस 75 हजार आणि तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस 50000 हजार असे असणार आहे.या स्पर्धेमध्ये नाव नोंदवण्यासाठी पुढील गुगल लिंक द्वारे नोंदणी करावयाची आहे. नाव नोंदणीसाठी अंतिम दिनांक 23 ऑक्टोबर सायंकाळी 6 पर्यंत असणार आहे.
गुगल लिंक
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSft4IM13UKvhm7Q_A8nTgWlcpVcGc6pbddhs-PQYaGB7QzjTA/viewform?usp=dialog
तरी कोल्हापूर शहरातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले आहे. त्याचबरोबर अधिक माहितीसाठी भाजपा जिल्हा कार्यालय नागाळा पार्क येथे संपर्क साधावा. शंतनु मोहिते 9669766955, शिवरत्न मेटिल 7620417667