दहावी परीक्षेचा निकाल उद्या १३ मे रोजी
schedule12 May 25 person by visibility 223 categoryशैक्षणिक

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे १३ मे रोजी जाहीर होणार आहे. उद्या दुपारी १ वाजता विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहू शकणार आहेत.
उद्या सकाळी ११ वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातील २३ हजार ४९२ माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. उद्या निकाल जाहीर असून विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता वेबसाईटवर जाऊन त्यांचे गुण पाहायला मिळतील.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ दरम्यान दहावीच्या परीक्षा घेतल्या होत्या. या परिक्षेला राज्यातील १६.११ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८.६ लाख मुलं, ७.४७ लाख मुली आणि १९ ट्रान्सजेंडर यांचा समावेश होता.
दहावीच्या विद्यार्थ्यांना mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवरून निकाल पाहता आणि डाउनलोड करता येणार आहे. त्याचसोबत विद्यार्थ्यांना आणखी काही वेबसाईटवर हा निकाल पाहयला मिळणार आहे.