कळंबा येथे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी, अंबाबाई देवीचा पालखी सोहळा, कुंकुमार्चन सोहळा मोठ्या उत्साहात
schedule13 May 25 person by visibility 183 categoryसामाजिक

कळंबा : येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी, अंबाबाई देवीच्या उत्सवानिमित्त सोमवारी सकाळी होम हवन घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य करण्यात आला होता तसेच दुपारी महिलांसाठी कुंकुमार्चन सोहळा उत्साहात पार पडला, रात्री हनुमान भेटीचा मुख्य पालखी सोहळा मोठ्या भक्ती भावामध्ये पार पडला. यावेळी नेत्रदीपक आतिषबाजी करण्यात आली. यात्रेनिमित्त मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खेळणी, खाद्य पदार्थाचे स्टॉल तसेच बच्चे कंपनीसाठी फन गेम उभारले आहेत. यात्रा काळामध्ये गावामध्ये चैतन्यमय भक्तिमय वातावरण पाहावयास मिळत आहे.
सोमवार सकाळी होम हवन घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य करण्यात आला होता हा नैवेद्य घरातील सुहासिनीने महालक्ष्मी अंबाबाईस अर्पण केला. यामुळे मंदिर परिसरात मोठी गर्दी होती. दुपारी महिलांसाठी कुंकुमार्चन सोहळा आयोजित करण्यात आला होता यामध्येही महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या, रात्री आठ वाजता हनुमान भेटीचा मुख्य पालखी सोहळा उत्साहात पार पडला यावे मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते यावेळी नेत्रदीपक आतिषबाजी करण्यात आली.
आज 13 मे रोजी सकाळी नऊ वाजता श्री महालक्ष्मी मंदिरात श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली असून सकाळी 11 वाजता महाप्रसाद वाटप होणार आहे. रात्री दहा वाजता स्वर विठ्ठलाई कलाविष्कार प्रस्तुत गौरव माय मराठीचा हा मराठमोळा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.