विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त!
schedule12 May 25 person by visibility 150 categoryक्रीडा

मुंबई : आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून भावूक पोस्ट शेअर करून विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. विराटच्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे.
विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. येत्या जून महिन्यात भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा पाहता बीसीसीआयने त्याला आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती केली होती. मात्र, विराट आपल्या निर्णयावर ठाम राहिला. अखेर आज त्याने १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावे अनेक मोठ्या विक्रमांची नोंद आहे. विराटने २०११ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्याहून आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरूवात केली होती. त्याला कसोटी क्रिकेटमध्ये १२३ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान २१० डावात फलंदाजी करताना त्याने ४६.९ च्या सरासरीने ९२३० धावा केल्या. यादरम्यान त्याने ३० शतकं आणि ३१ अर्धशतकं झळकावली.