कोल्हापूर महानगरपालिका : 80 टक्के सवलत योजनेमधून 19 कोटी 33 लाख रक्कम जमा; 31 मार्चपर्यंत घरफाळा दंडामध्ये 50 टक्के सवलत योजना सुरु
schedule28 Feb 25 person by visibility 285 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने दि.15 जानेवारी ते दि.28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या आदेशाने दंडात 80 टक्के सवलत योजना जाहिर करण्यात आली होती. या सवलत योजनेच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी 7.00 पर्यंत 3 कोटी 20 लाख इतकी रक्कम जमा झाली आहे. या सवलत योजनेच्या 43 दिवसांच्या कालावधीत 12,110 थकबाकीदार मिळकतधारकांकडून रु.19 कोटी 33 लाख थकीत रक्कम महापालिकेकडे जमा झाली आहे.
घरफाळा विभागाच्यावतीने दि.01 एप्रिल 2024 ते दि.28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत आज अखेर 1,03,436 मिळकतधारकांकडून रु.63 कोटी 61 लाख इतकी रक्कम जमा करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शुक्रवारी रात्री 10 वाजेपर्यंत सर्व नागरी आरोग्य सुविधा केंद्रे सुरु ठेवण्यात आली होती. शनिवार, दि.1 ते 31 मार्च 2025 पर्यंत घरफाळा थकीत दंडामध्ये 50 टक्के सवलत देण्यात येत आहे.
तरी अद्यापही थकीत मिळकतधारक आहे. त्यांनी या सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.