निपाणी ते मुरगूड रोडवर कुंभार गेट चौक येथे गुटख्याची वाहतूक करणाऱ्या 1 आरोपीसह टेम्पो पकडून एकूण 2,51,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त
schedule09 Oct 24 person by visibility 582 categoryगुन्हे
कोल्हापूर : निपाणी ते मुरगूड रोडवर कुंभार गेट चौक येथे 76,500/- रुपये किमंतीच्या गुटख्याची वाहतूक करताना 01 आरोपीसह टेम्पो पकडून एकूण 2,51,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर पथकाने ही कारवाई केली.
आज दिनांक ०९ ऑक्टोंबर रोजी निपाणी ते मुरगूड रोडवरून अवैद्य गुटख्याची वाहतुक होणार असलेची माहिती पथकातील पोलीस अंमलदार योगेश गोसावी यांना मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी निपाणी ते मुरगूड जाणारे रोडवर कुंभार गेट चौक येथे सापळा लावून अवैद्यरित्या गुटखा वाहतुक करीत असताना टाटा कंपनीचा आयरिस टेम्पो क्र. MH-09- CM-5629 हा पकडला. चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव दत्तात्रय शिवाजी राणे, वय 34 वर्षे, रा.मु.पो. सोनारवाडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर असे सांगितले.
टेम्पोमध्ये असलेल्या मालाबाबत त्याचेकडे विचारणा केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवू लागला. त्यानंतर पंचासमक्ष टेम्पोची झडती घेतली असता त्याचे कब्ज्यात 76,500/- रूपये किंमतीचा गुटखा, 1,75,000/- रूपये टाटा कंपनीचा आयरिस टेम्पो असा एकूण 2,51,500/- रूपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला.
याबाबत मुरगूड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असून गुन्हयाचा पुढील तपास मुरगूड पोलीस ठाणे करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, वैभव पाटील, प्रविण पाटील, संतोष बरगे, परशुराम गुजरे, गजानन गुरव.. विजय इंगळे, प्रदिप पाटील, विशाल खराडे, महेंद्र कोरवी, हंबीर अतिग्रे यांचे पथकाने केलेली आहे.