SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महिला समानता दिन: समानतेच्या हक्काची आणि प्रगतीची नवी क्षितिजेसीमेवरील जवानांसाठी करवीरकर भगिनींची ओवाळणी: 'एक राखी' ठरतेय बारा हत्तींचे नैतिक बळ!पंचगंगा प्रदूषण करणाऱ्यांवर ठोस कारवाई करा : आमदार यड्रावकर ; पंचगंगा प्रदूषणासंदर्भात मुंबई मंत्रालयात बैठक संपन्न स्थानिक विकास निधीतून उचगावमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ, उचगावच्या सर्वागिण विकासासाठी १ कोटी रूपयांचा निधी देणार, खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाहीआमदार यड्रावकर यांचा पाठपुरावा : सरंजाम इनाम जमिनींचा प्रश्न मार्गी लागणार राज्यात खळबळ! धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात 'एस.पी. गँग'वर कोल्हापुरात पहिलीच MCOCA कारवाई; बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी व गर्भपाताचा गोरखधंदा चालवणाऱ्या ११ जणांच्या मुसक्या आवळल्याडी. वाय. पाटील विद्यापीठाचा ‘टाटा स्किल्स’ सोबत सामंजस्य करारविभागीय कार्यालय स्तरावर नागरिकांच्या तक्रारी सोडवा; अतिक्रमणावर सातत्याने कारवाई करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडसंजय घोडावत इन्स्टिट्यूटचा १४वा वर्धापनदिन उत्साहात साजराएकल महिलांची नोंदणी करण्यासाठी महापालिकेचे सर्वेक्षण सुरू

जाहिरात

 

इंदुरमध्ये २८ तृतीयपंथीयांकडून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न

schedule16 Oct 25 person by visibility 428 categoryगुन्हे

नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या इंदुरमध्ये  २८ तृतीयपंथीयांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. सर्वांनी फिनाइल प्राशन केल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असून सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एमवाय रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ देखील  सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हे संपूर्ण प्रकरण एका तृतीयपंथीयावर झालेल्या कथित बलात्कार आणि खंडणी प्रकरणाशी संबंधित आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना इंदुरच्या पंढरीनाथ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नंदलालपुरा भागात घडली. याठिकाणी राहणाऱ्या २८ तृतीयपंथियांनी एका खोलीमध्ये दरवाजा बंद करून फिनाइल प्राशन केले. याचा व्हिडीओ तयार करून त्यांनी सोशल मीडियावर टाकला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडला आणि सर्व तृतीपंथी यांना बाहेर काढले आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

 नंदलालपुरा येथे दोन तृतीयपंथीयांच्या गटांमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू आहे. येथे एक गट सपना गुरुचा आहे तर दुसरा गट सीमा आणि पायल गुरुचा आहे. दोघांमध्ये अनेकदा वाद होतात. मंगळवारी किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर लक्ष्मी त्रिपाठी देखील इंदूरला आले आणि त्यांनी या वादाबाबत अधिकाऱ्यांची भेट घेतली. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तृतीयपंथीयांमधील या वादाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. परंतु तपास पूर्ण होऊ शकला नाही.

बुधवारी रात्री तृतीयपंथीचा एका गटाने रस्त्यावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी एका खोलीत जाऊन दरवाजा बंद करून एकत्रित फिनाइल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान या घटनेनंतर तृतीयपंथीच्या एका गटाने रस्त्यावर चक्काजाम आंदोलन  केले.  पोलिसांनी सर्वांची समजूत काढत त्यांना बाजूला हटवले आणि वाहतूक सुरळित केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes