SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोंडीग्रे येथील आरोग्य शिबिरात ४२२ नागरिकांची तपासणीपदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने मैदानात उतरावे : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणगोकुळ निवडणुकीत मंत्र्यांच्या मुलाविरोधात सर्वसामान्य शेतकरीपुत्र मैदानात; शशिकांत खोतांचा जोरदार हुंकार!शिक्षकांच्या अन्यायाविरोधात रोष! पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर ‘एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेने’चा बहिष्कारथकबाकीदारांना नोटिसा बजावून वसुली करा, अन्यथा मिळकतींवर बोजा नोंदवा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारूडरग्गेडियनच्या ‘रंगताली’ दांडिया-गरबा नाईटला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसादमहायुतीच्या ऐतिहासिक विजयात राधानगरी- भुदरगडचा सिंहाचा वाटा असेल; पालकमंत्री प्रकाश आबिटकर व माजी आमदार के. पी. पाटील यांचा विश्वासआंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण दिन: एक महत्त्वपूर्ण जागतिक मोहीमकोल्हापूर जिल्ह्यात 26 ऑक्टोबरपर्यंत बंदी आदेश लागूपोलीस स्मृती दिनी पोलीस हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून वाहणार श्रद्धांजली

जाहिरात

 

कोंडीग्रे येथील आरोग्य शिबिरात ४२२ नागरिकांची तपासणी

schedule13 Oct 26 person by visibility 162 categoryआरोग्य

◼️आजअखेर आरोग्य अभियानातील लाभार्थ्यांची संख्या ६ हजार ७४६ वर

कोंडीग्रे : सहकारमहर्षी स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन आणि शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यड्राव यांच्या संयुक्त विद्यमाने कोंडीग्रे येथे आयोजित मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरात ४२२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १८९ नागरिकांची आरोग्य तपासणी, तर २३३ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना मोफत आरोग्यसेवेचा लाभ मिळाला.

स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिरोळ तालुक्यातील विविध गावांमध्ये मोफत आरोग्य व नेत्र तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध व्हावी, तसेच आरोग्याबाबत जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने या अभियानांतर्गत विविध गावांमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

कोंडीग्रे येथील शिबिरात ४२२ नागरिकांनी आरोग्य व नेत्र तपासणी करून घेतली. यापूर्वी धरणगुत्ती येथे झालेल्या शिबिरात ५३० नागरिकांची तपासणी करण्यात आली होती. या दोन्ही शिबिरांतील लाभार्थ्यांसह आजअखेर या आरोग्य अभियानांतर्गत एकूण ६ हजार ७४६ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांकडून या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी सुनील कामत, जयदीप पाटील, तात्यासो पाटील, नाना कांबळे, शांतिनाथ मालगावे, शिवाजी कांबळे, दिलीप यादव, सुनील हनबर, अण्णासाहेब बिलोरे, कुमार मिस्त्री यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes