SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : 'या' प्रशासकीय अधिकाऱ्याच्या वैद्यकीय पात्रता आणि फिटनेस प्रमाणपत्राबाबत गंभीर शंका; चौकशीची मागणीतमदलगे येथे आरोग्य शिबिरात ४३० जणांची तपासणीगोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार नाही उद्या पॅनेल जाहीर करणार : आमदार सतेज पाटील डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आणि 'बजाज स्टेप'च्या पहिल्या तुकडीचा दिमाखदार पदवीदान समारंभ डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांचा जागतिक पातळीवर डंकाचाकूचा धाक दाखवून वृद्ध महिलेला लुटणारा आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईकोल्हापुरात एलसीबीची धडक कारवाई; २ लाखांच्या एम.डी. ड्रग्ससह दोघे जेरबंदपुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्तीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या लोकसेवेच्या कार्यकाळानिमित्त कोल्हापुरात ‘सेवा ज्योती यात्रा’राष्ट्रीय नूडल दिन: चवदार नूडल्सचा खास सोहळा!

जाहिरात

 

तमदलगे येथे आरोग्य शिबिरात ४३० जणांची तपासणी

schedule06 Oct 26 person by visibility 143 categoryआरोग्य

तमदलगे : सहकारमहर्षी स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन आणि शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यड्राव यांच्या संयुक्त विद्यमाने तमदलगे येथे मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा ४३० जणांनी लाभ घेतला. शिबिरात २९७ नागरिकांची बीपी, शुगर व नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच प्राथमिक विद्यामंदिरमधील १३३ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. 

तपासणीदरम्यान नागरिकांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबतही आवश्यक सूचना देण्यात आल्या. या शिबिराला अजय पाटील यड्रावकर यांनी भेट दिली.
स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिरोळ तालुक्यातील विविध गावांमध्ये मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरे घेण्यात येत आहेत.

 या अभियानांतर्गत यापूर्वी कवठेसार, कोथळी, दानोळी, उमळवाड, चिपरी, जैनापूर आणि निमशिरगाव येथे शिबिरे घेण्यात आली आहेत. तमदलगे येथील ४३० जणांची तपासणी धरून आजअखेर या अभियानांतर्गत एकूण ३ हजार ७१४ नागरिकांची आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात आली आहे.

तमदलगे येथील शिबिरासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक तसेच ग्रामस्थांनी सहकार्य केले.
यावेळी पिरगोडा पाटील, चवगोडा पाटील, राजू आडमुठे, सुरेश परीट, आण्णासो पाटील, पी. सी. पाटील, महावीर धुळासावत, सुरगोडा पाटील, सरपंच पांडुरंग नंदीवाले, बंडू परीट, महावीर पाटील, बाबासो गुरव आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes