कोल्हापूर : 'या' प्रशासकीय अधिकाऱ्याच्या वैद्यकीय पात्रता आणि फिटनेस प्रमाणपत्राबाबत गंभीर शंका; चौकशीची मागणी
schedule06 Oct 26 person by visibility 122 categoryसामाजिक
कोल्हापूर : कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात (CPR) कार्यरत प्रशासकीय अधिकारी मानसिंग जगताप यांच्या रंगअंधत्वाबाबतच्या (Colour Blindness) वैद्यकीय नोंदी आणि त्यांना मिळालेल्या फिटनेस व दिव्यांग प्रमाणपत्रात मोठी विसंगती असल्याचे समोर आले आहे. सामाजिक कार्यकर्ते धनाजी हरी पाटील यांनी याप्रकरणी गंभीर आक्षेप घेत या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची जोरदार मागणी केली आहे.
माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांनुसार, जगताप यांनी स्वतः रंगअंध असल्याचे मान्य केले होते, मात्र ससून रुग्णालयाच्या बोर्ड ऑफ रेफरलच्या प्रक्रियेनंतर त्यांना फिटनेस प्रमाणपत्र देण्यात आले. यासंदर्भातील माहिती लपवण्याचा प्रयत्न होत असून, नियमबाह्य पद्धतीने हे प्रमाणपत्र मिळवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत जगताप यांना त्यांच्या प्रशासकीय पदावरून निलंबित करण्यात यावे, अशी मुख्य मागणी पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे.