SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोरे अभियांत्रिकीत इंडस्ट्री रेडी इंजिनिअर (IRE) प्रोग्रामचा प्रारंभ हरिनामाच्या गजरात कोल्हापूर ते प्रति पंढरपूर नंदवाळ ‘कार्तिकी दिंडी’ सोहळा उत्साहात दिव्यांगांच्या हक्कांच्या प्रभावी संरक्षणासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तांची कार्यपद्धती निश्चित; सचिव तुकाराम मुंढे यांची माहितीतिसऱ्या टी-२० मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच विकेट्सने केला पराभवLVM3-M5 रॉकेट: इस्रोने इतिहास रचला, श्रीहरिकोटा येथून 'बाहुबली'चे प्रक्षेपणनाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराला टाटा टेक्नॉलॉजीचा सकारात्मक प्रतिसादबालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचे राज्य शासनामार्फतच आयोजनसुधारित अनुदान योजनेसाठी १४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहनसंतांचे विचार आणि वारकरी परंपरा समाजाला ऊर्जा देणारी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेबळीराजाला सुखी, समाधानी ठेव… पांडुरंगचरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साकडे!

जाहिरात

 

केआयटी आय.आर.एफ च्या १० स्टार्टअप्सना ५० लाखांचा निधी मंजूर

schedule09 May 24 person by visibility 2170 categoryसामाजिक

🟣भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या निधी आयटीबीआय अंतर्गत सहकार्य

कोल्हापूर : केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयात केआयटी आय.आर.एफ. ही ना नफा ना तोटा या हेतूने सेक्शन ८ अंतर्गत नोंदणीकृत केलेली कंपनी आहे. भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या निधी आयटीबीआय अंतर्गत परिसरातील विविध नवोद्योजकांकडून आर्थिक मदतीसाठी विविध प्रस्ताव मागितलेले होते.

एकूण प्रस्तावांपैकी १० प्रस्तावांना विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने ५० लाखांचा निधी मंजूर झालेला आहे. मंजूर झालेला निधी चा तपशील खालील प्रमाणे

अनु.क्र. प्रकल्पाचे नाव व्यक्तीचे नाव मंजूर निधी
१ इरॉक्स अनिकेत राजाराम वाळके ६ लाख
२ सिविड कल्टिवेशन रिषभ मल्होत्रा आणि निनाद जाधव ४ लाख 

३ हेल्थ लिंक कॉप्यानियन श्रीमती मालन शिरगुपीकर आणि सौ.दिव्याराणी ५ लाख
४ एफ.आर.पी. प्रोफाइल्स अमोल कलगोंडा पाटील ६ लाख
५ डिबलर टाईप फर्टीलायझेशन मशीन संग्राम विकास पाटील ३ लाख
६ बॉयलर बर्ड्स हार्वेस्टिंग मशीन सौरभ भोसले ५ लाख
७ सलिव्हा सेंटीनल श्रुतिका दळवी २.५ लाख
८ अपारंपारिक पीएनपी अविनाश मानसिंग पुढाले ५ लाख
९ सिल्वर सोल्डरिंग मशीन श्रेयस कुलकर्णी ४.५ लाख
१० सोलर स्मार्ट ई-युनीरल सिस्टीम विनायक तातोबा कुंभार ५ लाख
११ राखीव निधी - ४ लाख 

या सर्व प्रक्रियेला संस्थेचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले,संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांचे प्रोत्साहन मिळाले.भारताच्या विकासासाठी परिसरातील नवोद्योजकांच्या स्टार्टप्सना भविष्यातही केआयटी आय.आर.एफ. योग्य त्या प्रकारचे आर्थिक,तांत्रिक व व्यावसायिक मार्गदर्शन करेल असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

केआयटी आय.आर.एफ. चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर आरळी, इंक्युबॅशन मॅनेजर श्री देवेंद्र पाठक, इंक्युबॅशन असोसिएट श्री पार्थ हजारे व अंजोरी कुंभोजे यांनी या सर्व प्रक्रियेसाठी मोलाचे तांत्रिक सहकार्य केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes