केआयटी च्या ५९ विद्यार्थिनींची इन्फोसिस मध्ये निवड
schedule07 Nov 25 person by visibility 192 categoryशैक्षणिक
🔸आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतीय कंपनीकडून महिला सशक्तीकरणाचा नवा पायंडा.
कोल्हापूर : केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त प्रदत्त) महाविद्यालयाच्या ५९ विद्यार्थिनींची आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय ब्रँड म्हणून विकसित झालेल्या इन्फोसिस या कंपनीमध्ये निवड करण्यात आली आहे. महिला सशक्तिकरणाच्या एका नव्या अध्यायाची सुरुवात भारतीय कंपनीने केली आहे. फक्त विद्यार्थिनींसाठी झालेल्या या निवड प्रक्रियेमध्ये शिवाजी विद्यापीठातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालये सहभागी झालेली होती. शिवाजी विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ही निवड प्रक्रिया संपन्न झाली.केआयटी च्या एकूण सात विभागातून ५९ विद्यार्थिनींची निवड केली गेली आहे.
या दर्जेदार प्लेसमेंट नंतर बोलताना महाविद्यालयाचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी म्हणाले," महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या दर्जेदार प्लेसमेंट साठी लक्ष केंद्रित केलेले आहे. सर्व विभागातील विद्यार्थ्यांच्या तिसऱ्या सेमिस्टर पासून ते सातव्या सेमिस्टर पर्यंत विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी वेगवेगळ्या विषयातील प्रशिक्षण मार्गदर्शन प्रोफेशनल व्यक्तींच्या कार्याने केले जाते." अशा उद्देश पूर्ण प्रयत्नांच्या मुळेच केआयटी गेल्या काही वर्षापासून प्लेसमेंट मध्ये आघाडीवर आहे.
संस्थेचे ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी डॉ.अमित सरकार म्हणाले,“ दुसऱ्या वर्षापासून विद्यार्थ्यांना ग्रुप डिस्कशन, संभाषण कौशल्याच्या माध्यमातून ‘व्यक्त होण्यासाठी’ प्रोत्साहित व मार्गदर्शित केले जाते. वेगवेगळ्या ऑनलाईन,ऑफलाईन एप्टीट्यूड टेस्ट च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा उत्तम सराव तिसऱ्या वर्षामध्ये करून घेतला जातो.अंतिम वर्षात कंपनीच्या गरजे प्रमाणे काही विषयांचे विशेष मार्गदर्शन अंतर्गत किंवा इंडस्ट्री मधील तज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून केले जाते.
केआयटीचे अध्यक्ष साजिद हुदली आपल्या मनोगतात म्हणाले, “ त्याच्या मधील नेतृत्वगुण ,संभाषण कौशल्या सारख्या अन्य क्षमतांचा विकास होण्यासाठी महाविद्यालयातील विविध स्टुडंट क्लबचे उपक्रम पूरक ठरतात.त्याचवेळी प्लेसमेंट साठी सातत्याने होणाऱ्या विशेष मार्गदर्शनामुळे तांत्रिक ज्ञानाचाही विकास होतोच.विशेष म्हणजे येथील अभ्यासक्रमही निश्चित करताना आधुनिक उद्योग जगतासाठी आवश्यक असणाऱ्या विषयांचा अंतर्भाव करण्याचा अग्रक्रमाने विचार केला जातो.
या सर्व प्रक्रियेमध्ये केआयटी मधील प्रा.अविनाश पवार,प्रा.चैतन्य पेडणेकर,प्रा.विनय प्रभावळकर,प्रा.प्रीतम निकम व सबंधित विभाग प्रमुख यांचा मोलाचा सहभाग आहे.विशेष म्हणजे या प्लेसमेंट च्या आधी संस्थेतील तज्ञ प्रा.अजय कापसे यांनी विद्यार्थ्यांना कंपनीच्या अपेक्षेबद्दल विस्तृतपणे मार्गदर्शन केले त्याचा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना झाला आहे.संस्थेचे अध्यक्ष श्री साजिद हुदली, उपाध्यक्ष श्री सचिन मेनन सचिव श्री दीपक चौगुले अन्य विश्वस्त ,संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले. सर्व विश्वस्तांनी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केलेले आहे व त्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा ही दिल्या.