डीकेटीईचे प्रा. एस. सी. सगरे यांना पी.एच.डी. प्रदान
schedule07 Nov 25 person by visibility 54 categoryशैक्षणिक
इचलकरंजी : येथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल अॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरींग विभागात कार्यरत असणारे प्रा. एस.सी. सगरे यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडून पी.एच.डी. इन कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरींग ही पदवी प्राप्त झाली आहे. प्रा. सगरे हे गेली १३ वर्षापासून प्राध्यापक म्हणून डीकेटीईमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ‘डिझाईन अॅण्ड डेव्हलपमेंट ऑफ फ्रेमवर्क फॉर मायनिंग कोरीलेटेड टाईम कन्स्ट्रेन्ड हाय युटिलिटी आयटमसेटस’ या विषयावर पी.एच.डी. प्रबंध पूर्ण केला आहे. या संशोधनासाठी डीकेटीईचे कॉम्प्युटर विभागप्रमुख डॉ डी.व्ही. कोदवडे यांचे मार्गदर्शन लाभले.
पी.एच.डी. पूर्ण झालेबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व संचालक यांनी अभिनंदन केले व भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.एल.एस. अडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील विभागप्रमुख प्रा.डॉ. डी.व्ही. कोदवडे उपस्थित होते.