कोल्हापूर शहरातील रस्त्यांची कामे अपूरी व दर्जेदार नसलेने उपशहर अभियंता यांची एक वेतनवाढ रोखली
schedule07 Nov 25 person by visibility 123 categoryमहानगरपालिका
▪️रस्त्यांच्या कामाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी
कोल्हापूर : शहरातील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येक विभागीय कार्यालयास 50 लाख रुपये याप्रमाणे रक्कम रुपये 2 कोटी उपलब्ध करुन देण्यात आले होते. यातुन विभागीय कार्यालयातंर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या पॅचवर्क करणेसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. तथापि, रस्त्याच्या कामावर योग्य नियंत्रण, स्वत: देखरेख न करणे व गुणवत्तापुर्ण कामे न केल्याचा ठपका ठेऊन चारही विभागीय कार्यालयाकडील उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर व निवास पोवार यांची एक वेतनवाढ तात्पुरत्या स्वरुपात रोखण्याचे आदेश प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी निर्गमित केले.
त्याचबरोबर एनकॅपमधून परिख पुलासाठी अडीच कोटी निधी मंजुर असून या रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरु आहे, फुलेवाडी रिंगरोडसाठी दिड कोटी निधी मंजूर केले असलेने निविदा अंतिम टप्यात आहे. यापुर्वीही रिंगरोडसाठी निधी मंजूर करुन सदरची कामे पुर्ण करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर उर्वरीत रस्ते दुरुस्तीसाठी चारही विभागीय कार्यालयांना 2 कोटी निधी महानगरपालिका स्वनिधीमधून मंजूर करण्यात येणार आहे. सदरची मंजुर कामे पुढील 2 आठवडयामध्ये पुर्ण करुन घेण्याच्या सुचना संबंधित उप-शहर अभियंता व शहर अभियंता यांना दिल्या.