SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
करवीर काशी च्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन विशेषांकाचे थाटात प्रकाशनपन्हाळा किल्ला जगाच्या नकाशावर : जिल्हाधिकारी अमोल येडगे; युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळा किल्ल्याची नोंदशिवकालीन १२ किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन; महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण; ऐतिहासिक दुर्गसंपदेला जागतिक ओळखप्राथमिक तपासणी करून मतदान यंत्र सज्ज ठेवावीत : राज्य निवडणूक आयुक्तविद्यार्थ्यांना रोजगार संधींच्या दृष्टीने ‘एईडीपी’ उपयुक्त: डॉ. एन.एन. वडोदे; शिवाजी विद्यापीठात एकदिवसीय विशेष कार्यशाळाराज्यातील कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी, शासनाने कोणत्या उपाययोजना आखल्या : आमदार सतेज पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्याज परताव्याबाबत आमदार सतेज पाटील यांचा विधिमंडळात प्रश्न ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाकडे सभासद नोंदणी कराडीकेटीई व आयआयआयटी,धारवाड यांच्यामध्ये शैक्षणिक सामंजस्य करारकोल्हापूर महापालिकेच्यावतीने 59 सफाई कर्मचाऱ्यांची वैद्यकिय तपासणी पुर्ण

जाहिरात

 

डीकेटीई व आयआयआयटी,धारवाड यांच्यामध्ये शैक्षणिक सामंजस्य करार

schedule11 Jul 25 person by visibility 325 categoryशैक्षणिक

इचलकरंजी :  डीकेटीईचे टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट आणि इंडियन इन्स्टिटयूट ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी,धारवाड यांच्यात शैक्षणिक व संशोधन सहकार्याबाबत महत्त्वपूर्ण करार झाला आहे. या करारामुळे उच्च दर्जाचे शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार आहेत. जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकास,संशोधनाची गती आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता यामध्ये लक्षणीय वाढ व्हावी हा या करारामागचा उददेश आहे. 

डीकेटीईने यापूर्वीही अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अग्रगण्य संस्थाशी करार केले असून, आयआयआयटीसारख्या नामवंत संस्थेशी झालेला हा करार संस्थेच्या शैक्षणिक उंचीचा पुढचा टप्पा आहे.
या कराराअंतर्गत डीकेटीईचे विद्यार्थी आयआयआयटी धारवाडमध्ये शिक्षण घेवून मिळवलेले क्रेडिट डीकेटीईच्या क्रेडिटमध्ये ऍड होणार आहेत तसेच मायनर कोर्सेचा देखील उल्लेख असून विद्यार्थ्यांची,प्राध्यपकांची व संशोधकांची देवाणघेवाण, अल्पकालीन अभ्यासक्रम, संशोधन व विकास कार्यक्रम राबवले जाणार आहेत.

याशिवाय संयुक्तपणे पेटेन्ट तयार करणे,संशोधनलेख आंतरराष्ट्ीय जर्नलस्मध्ये प्रसिध्द करणे,विद्यार्थी व शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करणे,रिसर्च यासह संयुक्तरीत्या अनेक उपक्रम राबविले जाण्यासंबंधी करारात समावेश आहे.यामुळे आयआयआयटी येथील तंत्रज्ञानाचा लाभ डीकेटीईमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना होणार आहे. करारामुळे डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना आयआयआयटी धारवाड तर्फे हायब्रिड पध्दतीने आयोजित केलेल्या मायनर प्रोग्रॅममध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक सत्राच्या शेवटी या कार्यक्रमांचा समारोप आयआयआयटी धारवाडच्या परिसरात प्रत्यक्ष सहभागाच्या अनुभवाने होईल ज्यामध्ये विद्यार्थ्याना प्रत्येक्ष कौशल्य आत्मसात करण्याची आणि नामवंत संशोधक व तंत्रज्ञानतज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

इंडियन इन्स्टिटयूट ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी,धारवाड ही संस्था भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन झालेली संस्था आहे. आयआयआयटी,धारवाड ही कर्नाटक राज्यात नावाजलेली संस्था असून या संस्थेमध्ये कॉम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलीकम्युनिकेशन या शाखांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर कोर्सेस कार्यरत आहेत.

डीकेटीईच्या शिष्टमंडळानी आयआयआयटी येथे भेट दिली. आयोजित कार्यक्रमात आयआयआयटी चे डायरेक्टर प्रा. डॉ एस.आर.महादेवा प्रसन्ना, सीईओ.डॉ दीपक के.टी.,डॉ मंजुनाथ वानहळी आणि डीकेटीईच्या डायरेक्टर डॉ एल.एस.अडमुठे, प्रा.डॉ.व्ही.जयश्री, डीन प्रा.डॉ.एस.के.शिरगांवे यामध्ये चर्चा झाली.त्यानंतर डीकेटीई आणि आयआयआयटी यांच्यामध्ये विद्यार्थी कल्याणासाठी एकत्र येण्याचा तसेच एकमेकांना सहकार्य करण्याबाबत कराराचे आदानप्रदान झाले. यावेळी आयआयआयटीचे डायरेक्टर प्रा.एस.आर.महादेवा प्रसन्ना यांनी डीकेटीईचे कार्य याबद्दल कौतुकास्पद उद्गार काढले. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे,माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टी यांचे करारासाठी मार्गर्शन मिळाले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes