अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्याज परताव्याबाबत आमदार सतेज पाटील यांचा विधिमंडळात प्रश्न
schedule11 Jul 25 person by visibility 239 categoryराज्य

कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांचा व्याज परतावा तातडीने देण्यासाठी आणि महामंडळाचे पोर्टल अद्ययावत करण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे, असा प्रश्न विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, महामंडळाने NICSI या कंपनीमार्फत वेबप्रणाली अद्ययावत करण्याची कार्यवाही पूर्ण केली असून वेबप्रणाली सुस्थितीत सुरु असल्याचं सांगितले.
राज्यातील मराठा समाजातील तरुणांना उद्योजक बनविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून दिला जाणारा व्याज परतावा सहा-सात महिन्यांपासून थकीत असल्याकडे आमदार सतेज पाटील यांनी लक्ष वेधले.
महामंडळाचे महास्वयंम हे पोर्टल अद्ययावत केले नसून ते गेल्या १५ दिवसांपासून बंद असल्याने महामंडळाच्या प्राथमिक मंजूरी पत्र मिळणे अडचणीचे झाले आहे, हे खरे आहे काय? शासनाने याबाबत माहिती घेवून या महामंडळाच्या लाभार्थ्यांचा व्याज परतावा तातडीने देण्यासाठी आणि महामंडळाचे पोर्टल अद्ययावत करण्याबाबत कोणती कार्यवाही केली असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विचारले. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, महामंडळाने NICSI या कंपनीमार्फत वेबप्रणाली अद्ययावत करण्याची कार्यवाही पूर्ण केली असून वेबप्रणाली सुस्थितीत सुरु असल्याचे सांगितले.
महामंडळामार्फत एप्रिल, २०२५ पासून आतापर्यंत ५५३८ लाभार्थ्यांच्या एकूण ८३९६० दाव्यांच्या प्रकरणी रुपये ७१.९७ कोटीचा परतावा देण्यात आला आहे. मार्च, २०२५ च्या दरम्यान NICSI या कंपनीमार्फत सपोर्ट व मॅन्टनेंसचे काम सुरु होते. त्यामुळे महामंडळाचे पोर्टल धिम्या गतीने सुरु होते, मात्र बंद झाले नव्हते असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.