ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाकडे सभासद नोंदणी करा
schedule11 Jul 25 person by visibility 251 categoryराज्य

कोल्हापूर : राज्यातील ऑटोरिक्षा व मिटर्स टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन केले असून यासाठी ऑटोरिक्षा व मिटर्स टॅक्सी चालकांनी मंडळाकडे नोंदणी करावयाची आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र अर्जदारांनी https://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर ऑनलाईन सभासद नोंदणी करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे.
या कल्याणकारी मंडळाकडून केंद्र शासनामार्फत व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ ऑटोरिक्षा व मिटर्स टॅक्सी चालकांना देण्यात येणार आहेत.
त्यामध्ये प्रामुख्याने जीवन विमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्य विषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना (रु. 50 हजार रुपयांपर्यंत), पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, कामगार कौशल्य वृध्दी योजना, इ. योजनांचा समावेश आहे.