मुंब्रा येथे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य वाहतुकीवर कारवाई; ६३.९८ लाखाचा मुद्देमाल जप्त
schedule17 May 25 person by visibility 83 categoryगुन्हे

मुंबई : ठाणे येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक यांच्या भरारी पथकाने परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य (गोवा राज्यात निर्मित) वाहतुकीवर अमित गार्डनजवळ, मुंब्रा रोड, मुंब्रा, ता. जि. ठाणे येथे १६ मे २०२५ रोजी कारवाई केली. टेम्पो क्र. एम एच ०५ एएम १२६५ या वाहनावर संशय आल्याने वाहनावर छापा घालून गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यामध्ये परराज्यातील भारतीय बनावट विदेशी मद्याच्या (गोवा राज्यात निर्मित) एकूण ८०० बॉक्स दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत जप्त केले आहे.
या कारवाईमध्ये वाहनासह एकूण ६३ लाख ९८ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी जुल्फेकार ताजअली चौधरी (वाहनचालक) यास अटक केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ.राजेश देशमुख आयुक्त, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उपआयुक्त प्रदिप पवार, अधीक्षक प्रविण तांबे, उपअधीक्षक वैद्य, श्री.पोकळे, ए.डी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईमध्ये निरीक्षक एम.पी.धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक एन.आर.महाले, आर.के.लब्दे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक बी.जी.थोरात, जवान पी.ए.महाजन, श्रीमती एस.एस.यादव, एम.जी.शेख आदींचा सहभाग होता. या गुन्ह्याचा पुढील तपास अधिक्षक प्रविण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेश प्रकाश धनशेट्टी हे करीत आहेत.