अलमट्टी धरण उंचीवाढी विरोधात उद्या रविवारी चक्काजाम आंदोलन
schedule17 May 25 person by visibility 176 categoryराज्य

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये दरवर्षी भयावह पूरपरिस्थिती निर्माण करणारा अलमट्टी धरण उंचीवाढीचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी अलमट्टी उंचीवाढ विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने "चक्काजाम आंदोलन" पुकारण्यात आले आहे.
कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटर निर्णयाच्या विरोधात केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी शांततेच्या मार्गाने चक्काजाम आंदोलन रविवार, 18 मे रोजी, सकाळी 10 वाजता, अंकली पूल, कोल्हापूर-सांगली रोड येथे होणार आहे.
"पूरग्रस्त होण्यापासून आपल्या गाव, शेत आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी, हजारोंच्या संख्येने या चक्काजाम आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अलमट्टी उंचीवाढ विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीने केले आहे.