देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये 11वी सायन्ससाठी प्रवेश सुरू
schedule10 Jul 25 person by visibility 328 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : वाणिज्य शिक्षणातील गुणवत्ता पूर्ण महाविद्यालय म्हणून 68 वर्षाची गौरवशाली परंपरा असणाऱ्या कौन्सिल ऑफ एज्युकेशन संचलित देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स या NAAC ए मानांकित, ISO प्रमाणित, स्वायत्त महाविद्यालयामध्ये अकरावी शास्त्र शाखेसाठी महाराष्ट्र शासनाची परवानगी मिळालेली आहे आणि अकरावी शास्त्र शाखेचे प्रवेश सुरू झाले आहेत.
तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेऊन देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या अकरावी शास्त्र शाखेला आपला पहिला पसंतीक्रम द्यावा. कौन्सिल ऑफ एज्युकेशन तर्फे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये संस्थेचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी ही माहिती दिली.
नव्याने सुरू होणाऱ्या शास्त्र शाखेसाठी अद्ययावत प्रयोगशाळा, सुसज्ज वर्गखोल्या, ग्रंथालय आणि डिजिटल सुविधा, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी सुरक्षित वसतिगृह सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय सौ. रजनीताई मगदूम यांनी सांगितले. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, संचालक ॲड. प्रसाद बाडकर, संचालक ॲड. वैभव पेडणेकर, प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी यावेळी उपस्थित होते.