कोल्हापूर जिल्ह्यातील आगामी निवडणुका AIMIM पक्ष स्वबळावर लढवणार
schedule10 Jul 25 person by visibility 333 categoryराजकीय

कोल्हापूर : जिल्ह्यातील येणाऱ्या आगामी निवडणुका ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIM पक्ष हा स्वबळावर लढवणार आहे या संदर्भात कार्यकर्ते संवाद मेळावा पार पडला.
गुरुवार 10 जुलै रोजी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIM पक्षाचे महाराष्ट्र कार्यकारणीचे वरिष्ठ पदाधिकारी आणि पक्षाचे शिष्टमंडळ यांची आगामी जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि स्थानिक संस्थांच्या निवडणुका संदर्भात पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक पार पडली. तसेच पक्षाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष इम्रान सनदी यांच्या नेतृत्वात पक्षाचा कार्यकर्ते संवाद मेळावा संपन्न झाला.
कोल्हापूर जिल्ह्यातील येणाऱ्या सर्वच निवडणुका AIMIM पक्ष स्वबळावर लढवणार आहे तरी या अनुषंगाने पक्षाचा विस्तार आणि प्रचार सुरु आहे जिल्ह्यात शाखा बांधणी सुरु आहे. नवनवीन बहुजन समाजातील तसेच शिव शाहू फुले आंबेडकर विचारांचे शेकडो कार्यकर्ते पक्षात प्रवेश करत आहेत तरी निवडणुकीत पक्ष चांगली कामगिरी करेल अशी आशा वरिष्ठांनी व्यक्त केली.
यावेळी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष मुहम्मद युसूफ पुंजानी, महासचिव समीर साजिद, अतिक अहमद, सहसचिव सैफ पठाण, संवाद मेळ्याव्याचे प्रमुख आणि सहसचिव शफीउल्ला काझी, जिल्हा अध्यक्ष इम्रान सनदी उपाध्यक्ष इलियास कुन्नूरे, इरफान बिजली, हाफिज जुबेर सलमान नाईकवाडे, शफीक महात, सोहेल बागवान आदी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.