कोल्हापूर महापालिकेच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी जुनी कपडे, जुन्या गादयां व सर्व टाकाऊ इलेक्ट्रीक साहित्याचे घरोघरी संकलन
schedule10 Jul 25 person by visibility 259 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने सर्व प्रकारची कापडे, उशी, गादी, खराब बॅटरी, ट्यूब लाईट, बल्ब, टाकाऊ इलेक्ट्रीक वस्तू, मुदतबाह्य औषधे, हजरडस्ट मटेरियल, डास, मुंग्या व इतर किटक नाशक औषधे (कालबाह्य), जुनी पादत्राने या वस्तू घरोघरी घंटागाडीद्वारे संकलन करण्यात येणार आहे. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी शहरामध्ये हि मोहीम राबविली जाणार आहे. सदरची मोहिम अतिरिक्त शिल्पा दरेकर व सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जाणार आहे.
घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 नुसार केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या निर्देशानुसार शहरातील नागरीकांनी आपल्या घरातील वापरात नसलेले जुने कापडी साहित्य, वापरात नसलेले कपडे, हजरडस्ट मटेरियल, उशी, गादी व इतर कापडी साहित्य, सर्व प्रकारच्या खराब बॅटरी, ट्यूब लाईट, बल्ब, टाकाऊ इलेक्ट्रीक वस्तू, मुदतबाह्य औषधे, डास, मुंग्या व इतर किटक नाशक औषधे (कालबाह्य), जुनी पादत्राने इत्यादी वस्तू उघड्यावर किंवा इतरत्र न टाकता या वस्तूंवर महानगरपालिकेच्या संबंधीत कचरा प्रक्रिया प्रकल्पावर पाठवून शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यात यावी अशी तरतूद आहे. या शासन निर्देश/तरतूदीनुसार शहरातील सर्व नागरीकांनी आपल्या घरातील वापरात नसलेले सर्व प्रकारचे टाकाऊ साहित्य या महिन्यातील बुधवार, दि.16 जुलै 2025 रोजी आपल्या घरोघरी येणाऱ्या कचरा घंटागाडी (टिप्पर) मध्ये सकाळी जमा करण्यात यावे. यानंतर त्याचदिवशी आपल्या दारी दुसऱ्या खेपेसाठी येणाऱ्या घंटागाडीमध्ये आपला दैनंदिन वर्गीकृत केलेला ओला व सुका कचरा जमा करुन घेतला जाणार आहे. हा उपक्रम येथून पुढे महानगरपालिकेमार्फत नियमितपणे राबविण्यात येणार आहे. तरी नागरीकांनी आपले टाकाऊ साहित्य इतरत्र अथवा रस्त्याकडेला कोठेही न टाकता महापालिकेच्या घंटागाडी कडे देऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा. तसेच या उपक्रमास नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात आले आहे.