कॉमर्स कॉलेजमध्ये दीक्षारंभ कार्यक्रम उत्साहात
schedule10 Jul 25 person by visibility 319 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर येथे विद्यार्थी विकास समिती आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने बीकॉम भाग 1 मधील नवप्रवेशित विद्यार्थ्यांकरिता दिनांक 10 जुलै 2025 रोजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची ओळख करून देण्याच्या उद्देशानेदीक्षा आरंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये महाविद्यालयाच्या वैभवशाली परंपरेविषयी माहिती दिली. यावेळी महाविद्यालयातील विभाग प्रमुख, समिती प्रमुख यांनी महाविद्यालयांमध्ये चालणारे विविध उपक्रम, समित्यांची कार्ये, विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या सुविधा, महाविद्यालयाचे नियम, रोजगार मार्गदर्शन, महाविद्यालयातील नियम, गणवेश, शिस्त, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ इत्यादी विषयी विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली.
तसेच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी सर्व शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यार्थी विकास समिती प्रमुख डॉ. अशोक बन्ने, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. शिवलिंग राजमाने, उपप्राचार्य डॉ.आर. एस. नाईक इतर शिक्षक व बी.कॉम. भाग 1चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.