गुरुपौर्णिमेला धक्कादायक घटना : दोघा विद्यार्थ्यांकडून मुख्याध्यापकाचा खून
schedule10 Jul 25 person by visibility 338 categoryदेश

हरियाणा : हिसार जिल्ह्यातील नारनौंड येथील बास बादशाहपूर येथील कर्तार मेमोरियल सीनियर सेकंडरी स्कूलचे संचालक आणि मुख्याध्यापक जगबीर सिंग पानू यांची शाळेच्या आवारात त्याच शाळेतील बारावीच्या दोघा विद्यार्थ्यांनी खून केला.
विद्यार्थ्यांनी शाळेत घुसून जगबीरवर अनेक वार केले. शाळेतील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण दोघेही पळून गेले. शाळेतील कर्मचाऱ्यांनी जगबीरला रुग्णालयात नेले, परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी शाळेत सत्र सुरू होते. शाळेचे संचालक आणि मुख्याध्यापक जगबीर शाळेच्या आवारात उभे असताना दोन तरुणांनी शाळेत घुसून त्यांच्यावर हल्ला केला.
शाळेतील कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्याचा अलीकडेच शाळेच्या व्यवस्थापकाशी वाद झाला होता. त्यावरून बरीच वादावादी झाली होती.