राजर्षी शाहू सलोखा मंच, मराठा स्वराज्य भवन ट्रस्टतर्फे 'निमित्त फराळाचे, स्नेह बंधुत्वाचा...' उपक्रम उत्साहात
schedule26 Oct 25 person by visibility 84 categoryसामाजिक
कोल्हापूर : राजर्षी शाहू सलोखा मंच, मराठा स्वराज्य भवन ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित 'निमित्त फराळाचे, स्नेह बंधुत्वाचा...' या उपक्रमातून राजर्षी शाहूंच्या मानवतावादी विचारांचे पुन्हा एकदा दर्शन झाले, असे प्रतिपादन शहर डी.वाय.एस.पी. प्रिया पाटील यांनी केले.
मंगळवार पेठ, पद्माळा येथील रेसकोर्स महादेव मंदिरात हा सामाजिकसलोखा वृद्धिंगत करणारा अनोखा उपक्रम शनिवारी झाला. यावेळी कोल्हापुरातील विविध जाती-धर्माचे प्रमुख, विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मल्हार सेनेचे बबनराव रानगे यांनी स्वागत केले. निमंत्रक व मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी कोल्हापूर ही राजर्षी शाहूंची नगरी असून येथे सर्व समाज एकोप्याने राहतात याबद्दलचा अभिमान व्यक्त केला.
यानंतर सुभाष देसाई, कादर मलबारी, सयाजी झुंजार, हसन देसाई, शिरिष देशपांडे, सतीश बाचणकर, सोमनाथ घोडेराव, रघुनाथ कांबळे, जयेश ओसवाल, महेश मछले, सतीश बाचणकर यांनी मनोगतव्यक्त केले. ज्येष्ठ विचारवंत सुरेश शिपूरकर, हसन देसाई, राधिका पाटील, स्नेहा पाटील, पृथ्वीराज कोळेकर यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास तहसीलदार स्वप्निल पवार, पापाभाई बागवान, गणी आजरेकर, संदीप देसाई, अशोक माळी, प्रकाश पाटील, उदय देसाई, बाळासाहेब भोसले, शंकरराव शेळके, मेघा मुळीक, संपत्ती पाटील, संयोगीता देसाई, विद्या साळोखे, संजीवनी चौगुले, सचिन इंगवले, भाऊसो काळे, शिवमूर्ती झगडे, जहांगीर अत्तार, चंद्रकांत पाटील, अनिल गिरी, बाळासो साळवे आदी उपस्थित होते. शशिकांत पाटील यांनी आभार मानले.