पुढील वर्षाच्या हज यात्रेचे अर्ज भरण्यासाठी शुक्रवारपासून सुरुवात
schedule08 Jul 25 person by visibility 163 categoryसामाजिक

कोल्हापूर : हज यात्रा 2026 साठी केंद्रीय हज समिती आणि महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीने नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार 7 जुलै पासून 31 जुलैपर्यंत हज 2026 साठी अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हज यात्रेसाठी जाऊ इच्छिणाऱ्या हज यात्रेकरूंचे अर्ज शुक्रवारी 11 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजल्यापासून मुस्लिम बोर्डिंगमध्ये भरण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.तरी हज यात्रेसाठी जाण्यास इच्छित यात्रेकरूंनी पासपोर्ट,पासपोर्ट साईज दोन फोटो,आधार कार्ड, पॅन कार्ड,रक्तगट माहिती,तसेच वारसाची माहिती व त्याचे आधारकार्ड ,मोबाईल क्रमांक अशी कागदपत्रे व त्याच्या छायांकित प्रति सोबत घेऊन यावे,
असे आवाहन हज फाऊंडेशन कोल्हापूर चे अध्यक्ष समीर मुजावर व लिम्रास चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हाजी इकबाल देसाई यांच्या वतीने करण्यात आले आहे.