न्यू इन्स्टिट्युटमध्ये रोजगार मेळावा संपन्न
schedule08 Jul 25 person by visibility 106 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : न्यू इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी आणि मॉडेल करिअर सेंटर (केंद्र सरकार-श्रम व रोजगार मंत्रालय) कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इन्स्टिट्युट, गड मुडशिंगी, उंचगाव, कोल्हापूर येथे डिप्लोमा उमेदवारांसाठी रोजगार मेळावा संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी नियोक्ते जॉन डीअर पुणे, जयहिंद इंडस्ट्रीज, पुणे, टायटन लॅब प्रायव्हेट लिमिटेड, महाड, व्ही इन्शुअर फार्मा पनवेल, मार्कसन्स फार्मा लिमिटेड, एसीएस इंडस्ट्रीज, मेनन पिस्टन्स, शिरोली, कार्ला ओव्हरसीज लिमिटेड सातारा, भारत फोर्ज लिमिटेड, बारामती आणि निबे डिफेन्स लिमिटेड, चाकण, पुणे उपस्थित होते. मुलाखतीसाठी 75 पेक्षा अधिक उमेदवार उपस्थित होते. ज्या पैकी 33 उमेदवार मुलाखतीच्या प्राथमिक फेरीत निवडले गेले. कार्यक्रमाचे मार्गदर्शन डॉ. संजय दाभोळे (एन. आय.टी. प्राचार्य), श्री जमीर करीम-सहायक आयुक्त तथा नोडल अधिकारी मॉडल करियर सेंटर (एम. सी. सी. कोल्हापुर) आणि कोल्हापूर जिल्हा कौशल्य विकास अधिकारी कौशल्या पवार यांनी केले.
श्रम व रोजगार मंत्रालयाच्या यंग प्रोफेशनल मेघना वाघ यांनी एन. सी. एस. (केंद्र सरकार चे रोजगार पोर्टल) विषयी विस्तृत माहिती दिली.
आभार अभिव्यक्ति श्री. वलिवडे, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी, एन.आई. टी. कोल्हापुर यांनी केली.