संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात नाट्य कार्यशाळा
schedule08 Jul 25 person by visibility 72 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाटयशास्त्र अधिविभागातर्फे २ ते ७ जुलै २०२५ रोजीनाट्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या नाट्य कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण १६ विद्यार्थ्यांनी या नाट्य कार्यशाळेचा लाभ घेतला.
कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी जितेंद्र देशपांडे आणि अधिविभागप्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांच्या हस्ते झाले. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी श्री. जितेंद्र देशपांडे यांनी संहिता निवड ते सादरीकरणापर्यंतचे विविध टप्पे विविध उदाहरणांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यशाळेच्या दुसर्या व शेवटच्या दिवशी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, दिल्ली येथून नाट्य प्रशिक्षण घेतलेले प्रसिद्ध नाट्य व चित्रपट कलाकार सलीम मुल्ला यांनी अभिनयातील बारकावे याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी अभिनयासाठी आवश्यक वेगवेगळ्या सराव पद्धती उपस्थितांना शिकविल्या.
कार्यशाळेच्या तिसर्या दिवशी प्रसिद्ध नाट्य अभिनेत्री डॉ. राजश्री खटावकर यांनी अभिनय म्हणजे काय?, अभिनयाची तोंडओळख या विषयांवर तर, चौथ्या दिवशी प्रसिद्ध रंगकर्मी व नाट्य प्रशिक्षक डॉ. संजय तोडकर यांनी नाटकातील तांत्रिक गोष्टींची तोंडओळख या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेची आयोजनाची जबाबदारी विकास कांबळे व मल्हार जोशी यांनी सांभाळली. कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी अधिविभागप्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई व इतर मान्यवरांच्या हस्ते नाट्य कार्यशाळेसाठी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
यावेळी डॉ. संजय तोडकर, राज पाटील, रविदर्शन कुलकर्णी, किरणसिंह चव्हाण, सलीम मुल्ला आदी शिक्षक व रंगकर्मी उपस्थित होते.