राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत रेल्वेने आगमन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांचे स्वागत; उद्या राज्यपालांचा शपथविधी
schedule14 Sep 25 person by visibility 164 categoryराज्य

मुंबई : महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे रविवारी (दि. 14) मुंबई येथे सपत्नीक आगमन झाले
अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शना देवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी राज्यपालांना मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांतर्फे मानवंदना देण्यात आली तर राजभवन येथे पोहोचल्यावर मुंबई पोलिसांतर्फे मानवंदना देण्यात आली.
उद्या सोमवार दि. 15 रोजी सकाळी 11 वाजता राज्यपाल आचार्य देवव्रत महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेणार आहेत.