पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांच्या निबंध, चित्रकला स्पर्धा
schedule14 Sep 25 person by visibility 144 categoryराज्य

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दि. १७ सप्टेंबर, २०२५ रोजी ७५ वा वाढदिवस आहे. या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.
सर्वसाधारणपणे राष्ट्र प्रथम, आत्मनिर्भर भारत, स्वदेश, ऑपरेशन सिंदूर, पर्यावरण हे या स्पर्धांचे विषय असणार आहेत. यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना वाढीस लागेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला आहे.
तालुका आणि जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या या निबंध व चित्रकला स्पर्धांमधील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावरील विजेत्या स्पर्धकांना सन्मानपत्र/प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.