मुंबईच्या राज्य निवड क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरचा ऋषिकेश कबनूरकरची राज्य संघात निवड
schedule14 Sep 25 person by visibility 170 categoryक्रीडा

कोल्हापूर : मुंबई येथे 11ते 13 सप्टेंबर रोजी झालेल्या राज्य निवड खुल्या क्लासिकल रेटींग स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनूरकरने 8 फेरीत खेळताना 3 बोर्डवर पुण्याचा ओम लामकने यांच्या वर विजय मिळवला 6.5 गुण मिळवून 3 क्रमाक मिळवून 45 फिडे गुणाची कमाई केली 10, 000रुपये चषक असे पारितोषिक मिळाले राज्य संघात निवड झाली विदेश शरणार्थी हा 7.5 गुण मिळवून प्रथम मिळवून अजिंक्यपद मिळविले त्याला 15,000 रुपयेचे पारितोषिक आणि चषक देऊन गौरविण्यात आले स्पर्धला दोन्ही खेळाडूना प्रत्येक फेरीला 1 तास अधिक चालीला वाढीव30 सेकंड अशी घड्याळ वेळ आहे
खुल्या राज्य निवड क्लासिकल बुद्धिबळ रेटींग स्पर्धेत 125 आंतरराष्ट्रीय फिडे मानांकित सह 164 खेळाडूंनी भाग घेतला होता यातुन 4 खेळाडूची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली 21 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली
ऋषिकेश कबनूरकर हा अनुज अकॅडमी, दाभोळकर कॉर्नर, ताराबाई पार्क येथे सराव करतो. तो स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याला कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन माजी सेक्रेटरी कृष्णात पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.