राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दिकीची हत्या
schedule13 Oct 24 person by visibility 410 categoryराज्य
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते बाबा सिद्दीक यांची शनिवारी, 12 ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे भागात तीन जणांनी गोळ्या घालून हत्या केली. नीलमनगर येथील त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकीच्या कार्यालयाबाहेर हा गोळीबार झाला. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) प्रकल्प व्यावसायिक शत्रुत्वावरुन ही घटना घडली असेल या दृष्टिकोनातून पोलीस तपास करत आहेत. गोळीबार प्रकरणी दोन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे, तर तिसऱ्या आरोपीच्या शोधात आहेत.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येने अनेक राजकीय नेत्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
शनिवारी मुंबईत तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणी दोन परप्रांतीय शूटर्सना पोलिसांनी अटक केली आहे. गुरमेल बलजीत सिंग (वय २३, हरियाणा) आणि धर्मराज राजेश कश्यप (उत्तर प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी चौकशीदरम्यान, ते कुख्यात गँगस्टर्स लॉरेन्स बिश्नोईच्या गँगमधील असल्याचे म्हटले आहे, अशी मागिती गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिली. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यावर झालेल्या गोळीबारात बिश्नोई गँगचा हात होता. याच गँगने बाबा सिद्दिकी यांची हत्या केल्याचा संशय आहे. अधिक मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी हत्या घडवून आणण्यासाठी गेली दीड ते दोन महिन्यापासून या परिसराची रेकी केली होती, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.
तिसऱ्या आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातेही आहे, त्यांनी लीलावती रुग्णालयात भेट दिली.गोळीबाराची घटना दुर्दैवी, निंदनीय आणि वेदनादायी असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.