SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिक्षणशास्त्र अधिविभागामध्ये पुस्तक परीक्षण उपक्रम संपन्नशिवाजी विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे दिपक काशीद अध्यक्ष; राकेश डोंगरे उपाध्यक्षसैन्य दलात अधिकारी पदासाठी नाशिक येथे मोफत भरतीपूर्व प्रशिक्षणभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाचे उद्घाटनRIMC प्रवेशपात्रता परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढनाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्याभाविकांना आरोग्य सेवा देण्यास आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा : सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर कोल्हापुरात शनिवारी 'ओबीसी जागृती परिषद'; आरक्षणासह विविध प्रश्नांवर होणार मंथनसमरजितसिंह घाटगे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश; भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने कोल्हापुरात १२ एप्रिल रोजी ब्राह्मण शेतकरी मेळावाजागतिक रोमा दिन: उपेक्षितांच्या अस्तित्वाचा आणि संस्कृतीचा उत्सव

जाहिरात

 

शिक्षणशास्त्र अधिविभागामध्ये पुस्तक परीक्षण उपक्रम संपन्न

schedule08 Apr 26 person by visibility 93 categoryराज्य

कोल्हापूर : शिक्षणशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर येथे पुस्तक परीक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आजच्या सामाज माध्यमाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनात रुची निर्माण करण्यासाठी सदर उपक्रमाचे आयोजन अधिविभागात केले जाते.त्यांतर्गत मराठी ,हिंदी व इंग्रजी अशा विविध भाषांमधील,विविध साहित्य प्रकारचे समालोचन विद्यार्थ्यांना करावयास सांगितले जाते.त्याअंतर्गत अधिविभागात दि.७ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक श्रीलाल शुक्ल लिखित राग दरबारी व लेखक आनंद यादव लिखित झोंबी या पुस्तकांचे परीक्षण करण्यात आले. बी.एड .एम.एड (एकात्मिक) प्रशिक्षणार्थी अनुताई सूरकर व अमृत मगदूम यांनी पुस्तकांचे परीक्षण केले.

 याप्रसंगी राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय कोल्हापूरचे प्राचार्य प्रा.डॉ.दत्तात्रय भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर सूचना केल्या तर  द न्यू कॉलेज शिवाजी पेठ, कोल्हापूर येथील समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ.अर्चना कांबळे जगतकर यांनी ‘पुस्तक परीक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या भाव भावनांशी नाते निर्माण करता आले पाहिजे’असे मत व्यक्त केले. यावेळी अध्यक्षस्थानी अधिविभागप्रमुख डॉ.चेतना प्र.सोनकांबळे या होत्या. पुस्तक परीक्षणाची पार्श्वभूमी  डॉ.विद्यानंद खंडागळे यांनी मांडली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर पडवी यांनी केले तर आभार संजना भालकर यांनी मानले. अधिविभागातील प्राध्यापक,शिक्षक व संशोधक विद्यार्थी ,एम एड, बी.एड .एम.एड (एकात्मिक) ,बी एस्सी .बी एड (ITEP) प्रशिक्षणार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes