SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिक्षणशास्त्र अधिविभागामध्ये पुस्तक परीक्षण उपक्रम संपन्नशिवाजी विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे दिपक काशीद अध्यक्ष; राकेश डोंगरे उपाध्यक्षसैन्य दलात अधिकारी पदासाठी नाशिक येथे मोफत भरतीपूर्व प्रशिक्षणभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाचे उद्घाटनRIMC प्रवेशपात्रता परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढनाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्याभाविकांना आरोग्य सेवा देण्यास आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा : सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर कोल्हापुरात शनिवारी 'ओबीसी जागृती परिषद'; आरक्षणासह विविध प्रश्नांवर होणार मंथनसमरजितसिंह घाटगे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश; भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने कोल्हापुरात १२ एप्रिल रोजी ब्राह्मण शेतकरी मेळावाजागतिक रोमा दिन: उपेक्षितांच्या अस्तित्वाचा आणि संस्कृतीचा उत्सव

जाहिरात

 

सैन्य दलात अधिकारी पदासाठी नाशिक येथे मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण

schedule08 Apr 26 person by visibility 127 categoryराज्य

कोल्हापूर : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी पात्र युवक-युवतींसाठी 4 ते 13 मे या कालावधीत SSB  कोर्स क्र. 65 साठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

 जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी दिनांक 30 एप्रिल रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे मुलाखतीस हजर रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने करण्यात आले.

उमेदवारांनी मुलाखतीला येताना Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील SSB-65 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे. एस.एस.बी. कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला/ मुलाखतीस जाताना घेऊन जाणे आवश्यक आहे. कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन उत्तीर्ण झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी C सर्टिफिकेट A किंवा B ग्रेड मध्ये पास झालेले व एनसीसी ग्रुप हेडक्वॉर्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणालीसाठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई मेल training.petenashik@gmail.com  व 0253-2451032 या दूरध्वनी किंवा 9156073306 या व्हॉट्स ॲप क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा, असे आवाहन सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल राहुल माने (निवृत्त) यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes