लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळणार आजपासून : आदिती तटकरे
schedule11 Sep 25 person by visibility 192 categoryराज्य

मुंबई : लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न अनेक महिलांना पडला होता. याबाबत लाडक्या बहिणी चिंतित होत्या. पण लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता आजपासून मिळणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी द्विट करत ही माहिती दिली आहे. त्यामुळे ऑगस्टचा हप्ता आजपासून महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याबाबत निधी वितरित करण्यात आला आहे. या योजनेसाठी ३४४ कोटी रुपयांचा निधी वर्ग केला असून आजपासून हे पैसे महिलांना दिले जाणार आहेत.
मंत्री आदिती तटकरेंनी केलेल्या द्विटमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे.
लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे, असं आदिती तटकरेंनी द्विट करत म्हटलं आहे.
येत्या ३-४ दिवसात सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जाणार आहे.