कोल्हापूर महानगरपालिका : विभागीय कार्यालयात अनुपस्थितीत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांचे अर्ध्या दिवसाचे वेतन कपात
schedule11 Sep 25 person by visibility 241 categoryमहानगरपालिका

▪️प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांची विभागीय कार्यालयाची तपासणी
कोल्हापूर : प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी नागरीकांच्या सोईसुविधा व त्यांच्या तक्रारीचे निराकरण तत्परतेने करण्यासाठी विभागीय कार्यालयात दोन दिवसांपुर्वी सहा.आयुक्तांची पुर्णवेळ नियुक्ती केली आहे. यावेळी सहा.आयुक्तांबरोबरच सर्व कर्मचाऱ्यांनी पुर्णवेळ कार्यालयात उपस्थित राहणेचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे सहा.आयुक्त विभागीय कार्यालयात पुर्णवेळ बसून आपले कामकाज करत आहेत. दुपारी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी विभागीय कार्यालय क्रं.1 गांधी मैदान व विभागीय कार्यालय क्रं.2 छत्रपती शिवाजी मार्केट येथील कार्यालयीन कामकाजाची आज पाहणी केली. या पाहणीवेळी प्रशासकांना विभागीय कार्यालय क्रं.1 गांधी मैदानकडील कनिष्ठ अभियंता अक्षय आटकर, अनिरुध्द कोरडे, कनिष्ठ लिपीक प्रतिक पाटील कार्यालयात उपस्थित नसलेचे आढळून आले. त्यामुळे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी या तीन कर्मचाऱ्यांचे अर्ध्या दिवसाचे विनावेतन केले आहे. यावेळी सहा.आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाने, उपशहर अभियंता महादेव फुलारी उपस्थित होते.