कोल्हापूर महापालिकेच्यावतीने डस्टबिन न वापरणाऱ्या 16 आस्थापनांवर दंडात्मक कारवाई
schedule11 Sep 25 person by visibility 158 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : शहरातील स्वच्छतेस बाधा आणणारा कचरा उघड्यावर टाकणाऱ्या आस्थापना व नागरिकांवर महापालिकेच्या पथकामार्फत दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार आज भवानी मंडप परिसरातील 16 फेरीवाल्यांना डस्टबिन न वापरल्याबद्दल प्रत्येकी रु.200/- तसेच खरकटे पाणी रोडवरती टाकल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना रु.200/- चा दंड असे करण्यात आला. यामध्ये भवानी मंडप परिसरातील 16 फेरीवाल्यांवर कारवाई करुन रु.3200 दंड वसूल करण्यात आला.
सदरची कारवाई सहायक आयुक्त कृष्णा पाटील व मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, विभागीय आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, आरोग्य निरीक्षक शुभांगी पवार, सुशांत कांबळे व मुकादम यांनी केली.
तरी शहरातील आस्थापना व नागरिकांनी आपला घरगुती व दुकानातील कचरा कोल्हापूर महानगरपालिकेने अधिकृत केलेल्या (घंटा गाडी ) वाहनांकडेच देणेचा आहे. अन्यथा सदरचा कचरा इतरत्र उघड्यावर, नाल्यामध्ये टाकल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित आस्थापनेवर नियंत्रण अधिनियम 1998 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल याची संबंधीतांनी नोंद घ्यावी असे आवाहन आरोग्य घनकचरा विभागामार्फत करण्यात आले आहे.