सत्यजित जाधव, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात गती; मतदारांकडून वाढता प्रतिसाद
schedule09 Jan 26 person by visibility 213 categoryराजकीय
कोल्हापूर : प्रभाग क्रमांक 11 मधील शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री सत्यजित चंद्रकांत जाधव व महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांची महिला मतदार व कार्यकर्त्यां सोबत मंगळवार पेठ येथे तस्ते गल्ली, देवणे गल्ली, प्रॅक्टिस क्लब परिसरात शक्ती प्रदर्शनाने घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला.
शिवसेना महायुतीचे उमेदवार सत्यजित जाधव, भाजपच्या माधुरी नकाते व निलांबरी साळोखे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या यशोदा मोहिते प्रभाग क्रमांक 11 मध्ये मैदानात आहेत. त्यांच्या प्रचारार्थ आज माजी आमदार जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार पेठ येथे तस्ते गल्ली, देवणे गल्ली, प्रॅक्टिस क्लब परिसरात शक्ती प्रदर्शनाने प्रचार फेरी काढण्यात आली.
यावेळी समर्थकांकडून महायुतीचा विजय असो, “कोण म्हणतं येत नाही, आल्याशिवाय राहत नाही; सत्यजित जाधव आगे बढो, हम तुम्हारे साथ है,” आदी घोषणा देण्यात आल्या. तसेच मतदारांशी संवाद साधत विजय करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात मतदार , समर्थक महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

