के.एम.टी.सवलत पास वितरण केंद्राच्या वेळेत बदल
schedule29 Apr 25 person by visibility 210 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : शाळा व महाविद्यालयांना असणाऱ्या दिर्घ मुदत उन्हाळी सुटीमुळे के.एम.टी. उपक्रमाचे श्री शाहू क्लॉथ मार्केट येथील विद्यार्थी सवलत पास वितरण केंद्र दि.05/05/2025 ते दि.09/06/2025 या कालावधीमध्ये सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेमध्ये सुरु राहील. या कालावधीमध्ये श्री महालक्ष्मी सवलत पास व अन्य सवलत पासचे वितरण सुरु राहील.
दि.10/06/2025 पासून के.एम.टी.चे सवलत पास वितरण केंद्र पूर्ववत स.8.00 ते रात्रौ 8.00 या नियमित वेळेमध्ये सुरु राहील,
या बदलाची नोंद सर्व सवलत पासधारकांनी घेऊन के.एम.टी. उपक्रमांस सहकार्य करावे, असे आवाहन करणेत येत आहे.