हरोली विविध विकास सेवा संस्था निवडणूक : बहुजन शेतकरी विकास पॅनलच्या विजयी उमेदवारांचा आमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर यांच्या हस्ते सत्कार
schedule29 Apr 25 person by visibility 175 categoryउद्योग

कोल्हापूर : हरोली येथील हरोली विविध विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीत श्री राजर्षी शाहू संस्था बचाव बहुजन शेतकरी विकास पॅनलने दमदार विजय मिळवला. बहुजन शेतकरी विकास पॅनलने १० जागांवर बाजी मारली.
नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केला आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नूतन संचालक तानाजी माने, संभाजी कदम, लक्ष्मण माने, नागेंद्र माने,बबन जाधव, मारुती माने, जगदीश जाधव, शहाजी माळी, साधना माने,चंदना भाट यांच्यासह भरतकुमार चौगुले,संग्राम भोसले, ईश्वरा माने,सुनील पाटील,उदय भोसले,नेमिनाथ चौगुले, रामा माने,आनंद भोसले, रामगोंडा पाटील,शांतिनाथ पाटील,अमर पाटील आदी उपस्थित होते.